आली का पंचाईत… लग्नाचा केक आईला भरवला, व्हिडीओ व्हायरल होताच घमासान; सोशल मीडियात दोन गटात जुंपली
नवरदेवाने वधूला केक भरवण्याऐवजी प्रथम आईला केक भरवल्याचा एक लग्नाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. नवरदेवाची ही कृती योग्य की अयोग्य, यावर नेटिझन्सचे दोन गट पडले असून, लग्नाच्या सोहळ्यात प्राधान्य कोणाला असावे यावर जोरदार चर्चा सुरू आहे.

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतरच आयुष्याची सेकंड इनिंग सुरू होते. ही इनिंग सुखाची जावी म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. म्हणून तर लग्न सोहळा आनंदात जावा म्हणून वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात. पण काही वेळेला पंचाईत येते. एका लग्नातही अशीच पंचाईत आली. लग्न लागताच केक कापला गेला. पण नवरदेवाने हा केक बायकोला न भरवता आईला भरवला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला अन् सोशल मीडियावर यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियात प्रतिक्रिया उमटल्या असून दोन गट निर्माण झाले आहेत. दोन गटांची परस्पर वेगळी मते आहेत.
लग्नाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लग्नानंतर नवरदेव आणि नवरी केक कापताना दिसत आहेत. केक कापल्यानंतर नवरदेव नवरीला केक भरवण्याऐवजी त्याच्या आईला केक भरवतो. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांनाही तो केक भरवतो. या व्हिडिओत तो नवरीला केक भरवताना दिसत नाही. आता हा व्हिडीओ व्हायरल झाला. लग्न दोघांचं पण तिसऱ्यांमध्येच जुंपली आहे. नवरदेवाने नवरीला सर्वात आधी केक भरवायला हवा होता, असं एका ग्रुपचं म्हणणं आहे. तर नवरदेवाची कृती योग्यच असल्याचा दावा दुसऱ्या ग्रुपने केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच जुंपली आहे.
व्हिडिओसोबत एक कॅप्शन शेअर करण्यात आली आहे. त्यावर लिहिलंय, माफ करा. पण सर्वात आधी केक नवरीला भरवला जायला हवा होता. लग्नाच्या दिवशी जीवनसाथी सर्वात महत्त्वाचा असतो, असं कॅप्शन या व्हिडिओवर लिहिलंय. या कॅप्शनमुळेच सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत असून दोन गट निर्माण झाले आहेत.
कोण काय म्हणाले?
आर्या सी. जे. नावाच्या एका यूजर्सने म्हटलंय, मुलगी तिचं घरदार सोडून तुमच्यासोबत नवीन आयुष्य सुरू करायला आळी आहे. आपल्या निर्णयावर तिला पश्चात्ताप होईल असं काही करू नका. लग्नाच्या दिवशी बायकोला पहिलं प्राधान्य असलं पाहिजे.
तर, लग्न हा नवरा बायकोचं नातं आहे. आईवडिलांप्रती प्रेम दाखवण्याचा हा क्षण नसतो. तर नवीन नात्याची ही सुरुवात असते, असं रसूल नावाच्या यूजर्सने म्हटलंय. आईवडिलांवर प्रेम असणं ही चांगली गोष्ट आहे. पण कुटुंबात आपण दुय्यम आहोत, याची जाणीव पत्नीला लग्नात होता कामा नये, असं एकाने म्हटलंय.
लग्नाच्या पहिल्याच दिवशी बायकोचं आपल्या घरात काय स्थान आहे हे नवरदेव दाखवून देत आहे, असं एका महिला यूजर्सने म्हटलंय. तर लग्न करून एखाद्या मुलीला घरी आणायचं आणि दुसऱ्याच दिवशी तिला बाजूला सारायचं हे अजबच आहे, असं दुसऱ्या महिला यूजर्सने म्हटलंय.
नवरदेवाचंही समर्थन…
नवरीचं समर्थनासोबतच नवरदेवाचं समर्थन करणाऱ्याही कमेंट आल्या आहेत. आईवडिलांमुळेच आजचा दिवस पाहण्याचा योग आला. मग आईला केक भरवला तर बिघडलं कुठे? असा सवाल अभिषेक सिंह नावाच्या यूजर्सने केला आहे. तर आईवडिल नेहमी पहिले. त्यानंतर बाकी. आपलं अस्तित्वच त्यांच्यामुळे आहे. बायको महत्त्वाची आहेतच. पण आईवडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, असं दुसऱ्याने म्हटलंय.
आपल्या संस्कृतीत आईवडिलांचा सन्मान केला जातो. पत्नीचा सन्मान करणंही आवश्यक आहे. पण आईवडिलांचं महत्त्व कमी होता कामा नये, असं आणखी एकाने म्हटलं आहे. जर त्याने बायकोला आधी केक भरवला असता तर घरातील लोकांना वाईट वाटलं असतं. जर आईला केक भरवला तर बायकोला वाईट वाटतं. तुम्ही कोणत्या दृष्टीकोणातून पाहता यावर सर्व अवलंबून आहे, असा तर्क एकाने लढवला आहे.