
कोणत्याही कार्यक्रमात, हळदी, पार्टीमध्ये असणारी एक गोष्ट म्हणजे दारू… दारुमध्ये देखील असंख्य प्रकार आहेत. पण कोरोना महामारीनंतर लोकांच्या ड्रिंकची आवड देखील बदलली आहे. एक काळ असा होता, जेव्हा Gin सर्वांच्या पसंतीस उतरत होती. पण आता Gin ची मागणी हळू – हळू कमी होताना दिसत आहे. आयडब्ल्यूएसआर अहवाल दर्शवितो की, 2024 मध्ये Gin विक्री वाढ 4% पेक्षा कमी झाली आहे, जी एका वर्षापूर्वी सुमारे 9% होती.
एक काळ असा होता जेव्हा, प्रत्येक पार्टी आणि बारमध्ये जिन ब्रँड्सची मागणी मोठ्या प्रमाणावर होती. पण आता जिन ब्रँडची मागणी दिवसागणिक होताना दिसत आहे. पूर्वीच्या तुलनेत ही घसरण आणखी धक्कादायक आहे. ग्रेटर थान, संसारा, शॉर्ट स्टोरी आणि स्ट्रेंजर अँड सन्स यासारख्या गोव्यातून आलेल्या अनेक क्राफ्ट जिन ब्रँड्सनी या बदलाचं नेतृत्व केलं. पण आता त्यांची गती मंदावत चालली आहे.
बाजारात जस-जसे नवीन पर्याय उपलब्ध होत आहेत, तशी लोकांची चव देखील बदलत आहे… जिनचा उत्साह आता व्होडका आणि टकीला सारख्या ड्रिंक वळला आहे. जिनची समस्या अशी आहे की त्याला व्हिस्कीसारखी ब्रँड स्टोरी स्कोप नाही. लोक त्यांचे आवडते ब्रँड आणि अगदी संपूर्ण दारूच्या श्रेणी देखील बदलण्यास तत्पर असतात. याच कारणामुळे व्होडका आणि टकीलाच्या मगणीत वाढ होत आहे.
लहान डिस्टिलरीज, म्हणजेच स्टार्टअप्स, जे क्राफ्ट जिनचे उत्पादन करतात, त्यांना कमी नफा, मर्यादित बाजारपेठ आणि मर्यादित बजेटमुळे संघर्ष करावा लागत आहे. ब्रँडला प्रसिद्ध करण्यासाठी त्यांचं मोठं योगदान असताना, मागणी कमी आहे. पण भारतातील बाजारात टिकून राहणं कठीण झालं आहे. ग्राहकांची चव लगेच बदलत आहे… काही तरी नवीन ट्राय करण्याकडे त्यांचा कल आहे…
युनायटेड स्पिरिट्सने नाओ स्पिरिट्समध्ये भागीदारी घेतली आहे आणि टिळकनगर इंडस्ट्रीजने संसार जिन बनवणारी स्पेसमन स्पिरिट्स लॅब विकत घेतली आहे. त्याच वेळी, अमृत डिस्टिलरी आणि जॉन डिस्टिलरीज सारखे जुने खेळाडू देखील आता जिन मार्केटमध्ये आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु या प्रयत्नांना देखील यश येत नाहीये, व्होडका आणि टकीला यांच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाल्यामुळे जिनची मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.