AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govardhan Asrani Died : कसा झाला ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचा मृत्यू? खरं कारण अखेर समोर

Govardhan Asrani Died : वयाच्या 84 व्या वर्षी असरानी यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाचं कारण अखेर समोर आलं आहे.

Govardhan Asrani Died :  कसा झाला ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचा मृत्यू? खरं कारण अखेर समोर
फाईल फोटो
| Updated on: Oct 21, 2025 | 11:12 AM
Share

Govardhan Asrani Died : शोले, चुपके-चुपके, अभिमान यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारणारे आणि डायलॉग “हम अंग्रेजों के ज़माने के जेलर हैं” या एक डायलॉगमध्ये प्रसिद्धीझोतात आलेले ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन झालं आहे वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिवाळीत असरानी यांच्या निधनाची बातमी समोर आल्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना जुहू येथील भारतीय आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अभिनेते असरानी यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली. चाहतेही त्यांच्या आवडत्या अभिनेत्याच्या निधनाने धक्क्यात आहेत. या सगळ्यात, असरानी यांच्या मृत्यूमागील खरं कारण अखेर उघड झाले आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या मृत्यूची चर्चा सुरु आहे.

कोणत्या कारणामुळे झालं असरानी यांचं निधन?

असरानी यांच्या निधनावर त्यांच्या मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘ते अस्वस्थ झाले होते आणि श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. म्हणून त्यांना तात्काळ रुग्णालयात दखल करण्यात आलं. डॉक्टरांनी नंतर सांगितलं की, त्यांच्या फुफ्फुसात पाणी जमा झाला आहे. दुपारी 3 वा. च्या सुमारास त्यांचे निधन झालं.” असरानी यांचे अंत्यसंस्कार त्या संध्याकाळी सांताक्रूझ स्मशानभूमीत झालं, जिथे त्यांचे जवळचे कुटुंब आणि मित्रांनी त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली.

असरानी यांचा करीयर…

असरानी यांच्या करीयरबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी 300 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं. त्यांनी केवळ विनोदीच नाही तर गंभीर आणि सहाय्यक भूमिका देखील सहजतेने केल्या नमक हराम, बावर्ची, गुड्डी, चुप चुप के, हेरा फेरी, हलचल, दीवाने हुये पागल आणि वेलकम सारख्या सिनेमांमध्ये काम करून खूप प्रसिद्धी मिळवली.

1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हरे कांच की चुडियां’ या सिनेमातून त्यांना हिंदी चित्रपटांमध्ये पहिला ब्रेक मिळाला, ज्यामध्ये त्यांनी अभिनेता विश्वजीतच्या मित्राची भूमिका साकारली होती. एवढंच नाही तर, “आज की ताज़ा खबर” आणि “चला मुरारी हीरो बनने” या सिनेमांमध्ये त्यांनी कोणती भूमिका साकारली नाही, तर त्यांनी या सिनेमांचं दिग्दर्शन केलं.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.