Video : ऐकावं ते नवलच!, लग्नातल्या जेवणात गांजा मिसळला, लग्नमंडपातून पाहुणे थेट हॉस्पिटलमध्ये…

फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या डान्या नावाच्या मुलीचे 19 फेब्रुवारीला लग्न झाले. लग्नाला आलेल्या पाहुण्यांना कंटाळा नये म्हणून लग्नातल्या जेवणात गांजा मिसळण्यात आला होता. त्यानंतर जे घडलं ते थक्क करणारं आहे.

Video : ऐकावं ते नवलच!, लग्नातल्या जेवणात गांजा मिसळला, लग्नमंडपातून पाहुणे थेट हॉस्पिटलमध्ये...
व्हायरल व्हीडिओ
| Updated on: Apr 24, 2022 | 4:26 PM

मुंबई : सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. अश्यात लग्नातील (wedding news) काही व्हीडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात लग्नातली एक घटना सध्या व्हायरल (Viral News) होतेय. यात लग्नातल्या जेवणात गांजा मिसळ्याची घटना समोर आली आहे. फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या डान्या नावाच्या मुलीचे 19 फेब्रुवारीला लग्न झाले. लग्नाला आलेल्या पाहुण्यांना कंटाळा नये म्हणून लग्नातल्या जेवणात गांजा मिसळण्यात आला होता. त्यानंतर जे घडलं ते थक्क करणारं आहे. नववधूने तिच्या लग्नात जेवण गांजा टाकल्याने पाहुण्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे पाहुण्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल.

नेमकं काय घडलं?

फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या डान्या नावाच्या मुलीचे 19 फेब्रुवारीला लग्न झाले. लग्नाला आलेल्या पाहुण्यांना कंटाळा नये म्हणून लग्नातल्या जेवणात गांजा मिसळण्यात आला होता. त्यानंतर जे घडलं ते थक्क करणारं आहे. नववधूने तिच्या लग्नात जेवण गांजा टाकल्याने पाहुण्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे पाहुण्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल.

यानंतर पोलीस लग्नात पोहोचले आणि पोलिसांनी या लग्नातील जेवण करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी लोकांना न कळवता त्यांच्या जेवणात गांजा टाकल्याचा आरोप लावला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाहुण्यांच्या जेवणात गांजा टाकल्यानंतर अनेक लोक आजारी पडले आणि अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. याशिवाय घरी परतत असताना गांजामुळे अनेक जण बेशुद्ध झाल्याचही समोर आले. ही बातमी वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

Video : आलिया भटच्या राधा गाण्यावर दोन तरूणी थिरकल्या… लोक म्हणतात “निव्वळ भारी!”

ड्रायव्हरची तलप, प्रवाश्यांना त्रास, चहा पिण्यासाठी चक्क ट्रेन थांबवली!

Video : उन्हाच्या तिरपेसोबत मांजरीचा खेळ, व्हीडिओ पाहून नेटकरी म्हणतात “How Cute!”