VIDEO | एटीएम लुटताना असे काय घडले की नोटा रस्त्यावर पसरल्या ? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात हा फिल्मी सीन आहे

| Updated on: Jan 18, 2023 | 11:07 AM

ज्यावेळी चोरटे चोरी करीत असतात, त्यावेळी तिथल्या एटीएमचा अलार्म जोरात वाजायला सुरुवात होते. त्यानंतर तीस सेंकदाच्या आत पोलिस तिथं घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही चोरट्यांची टोळी हरियाणा किंवा युपीची असावी असा पोलिसांना संशय आहे.

VIDEO | एटीएम लुटताना असे काय घडले की नोटा रस्त्यावर पसरल्या ? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात हा फिल्मी सीन आहे
ATM viral video
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई – एटीएमच्या (ATM) चोरीचा मजेशीर एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral video) व्हायरल झाला आहे. त्यामध्ये चोरटे चोरलेले पैसे रस्त्यावर फेकत असल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहेत. व्हायरल झालेल्या सीसीटिव्हीतील ही घटना तेलंगणा (telangana) राज्यातील आहे. गॅस कटरच्या साहाय्याने चोरट्यांनी एटीएमची मशीन कापून काढली. त्याचबरोबर एटीएममध्ये असलेले लाखो रुपये बॅगमध्ये भरुन घेतले. चोरटे फरार होण्याच्या टायमिंगला तिथं पोलिस पोहोचले या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एटीएमच्या मशीनच्या बाजूला एक गाडी उभी आहे. त्यातून काही लोक उतरुन एटीएमच्या केबिनमध्ये जात आहेत. त्याचबरोबर पैशांनी भरलेली बॅग चोरटे पोलिस गाडीत ठेवतं आहेत. त्याचवेळी पोलिसांची गाडी घटनास्थळी दाखल होते. पळून जात असलेल्या एका चोरट्याला पोलिसांच्या गाडीची धडक सुध्दा बसली आहे. त्यानंतर गाडी भरधाव वेगाने निघून जाते.

हे सुद्धा वाचा

ज्यावेळी चोरटे चोरी करीत असतात, त्यावेळी तिथल्या एटीएमचा अलार्म जोरात वाजायला सुरुवात होते. त्यानंतर तीस सेंकदाच्या आत पोलिस तिथं घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही चोरट्यांची टोळी हरियाणा किंवा युपीची असावी असा पोलिसांना संशय आहे.

चोरट्यांनी डल्ला मारलेलं एटीएम बॅंक ऑफ इंडियाचं आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएममधील एकोणीस लाख रुपये वाचले आहेत. ज्यावेळी पोलिसांच्या गाडीची आणि चोरट्यांच्या गाडीची टक्कर होते. त्यावेळी चोरट्यांच्या गाडीतून काही पैसे रस्त्यावर पडले आहेत.