
बाहुली.. ही प्रत्येकाच्या बालपणातील अविभाज्य भाग असते. लहानपणी मिळालेल्या असंख्य खेळण्यांमध्ये एक अशी बाहुली आवर्जून असते, जी खूप प्रिय असते. ‘बार्बी डॉल’ असो किंवा ‘तात्या विंचू’.. बाजारपेठेतही विविध बाहुल्यांचे सतत ट्रेंड्स येत असतात. सध्या अशीच एक ‘विचित्र’ बाहुली तुफान चर्चेत आली आहे. या बाहुलीला विचित्र म्हणण्यामागचं कारण तुम्हाला तिचा फोटो पाहिल्यावर लक्षात येईलच. मोठाले डोळे, अजब हास्य आणि डोक्यावर दोन शेंड्या.. असं या बाहुलीचं रुप आहे आणि तिचं नाव आहे ‘लबुबू डॉल’ (Labubu Dolls). सध्या मार्केटमध्ये या बाहुलीची इतकी क्रेझ आहे की सेलिब्रिटींनाही तिला खरेदी करण्याचा मोह आवरता आला नाही. किंबहुना सेलिब्रिटींकडे ती बाहुली दिसल्याने, सर्वसामान्यांमध्येही तिच्याविषयीचं कुतूहल अधिक वाढलंय, असं म्हणायला हरकत नाही. काहींना ही लबुबू डॉल ‘क्युट’ वाटतेय, तर काहींना ती ‘कुरुप’ वाटतेय. या बाहुलीची अचानक इतकी मागणी का वाढतेय, लोकांमध्ये त्याच्याविषयी इतकी क्रेझ का निर्माण झाली आणि ती खरेदी करण्यासाठी लोक वाट्टेल ती किंमत मोजायला का तयार आहेत, याविषयी सविस्तर समजून घेऊयात.. ...