नमस्कार आणि नमस्तेमध्ये नेमका फरक काय? 99 टक्के लोकांना नाही सांगता येणार

आपल्या दैनंदिन जीवनात आपण दररोज अनेकदा नमस्कार आणि नमस्ते या दोन शब्दांचा वापर करत असतो, मात्र नमस्कार कधी म्हणायचं आणि नमस्ते कधी म्हणायचं हेच आपल्याला माहीत नसतं, आपण अनेकदा चूक करतो, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

नमस्कार आणि नमस्तेमध्ये नेमका फरक काय? 99 टक्के लोकांना नाही सांगता येणार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2025 | 3:03 PM

आपल्या दैनंदिन जीवनात आपण दररोज अनेकदा नमस्कार आणि नमस्ते या दोन शब्दांचा वापर करत असतो, मात्र नमस्कार कधी म्हणायचं आणि नमस्ते कधी म्हणायचं हेच आपल्याला माहीत नसतं, आपण अनेकदा चूक करतो, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

नमस्कार आणि नमस्ते हे दोन शब्द सारखेच वाटतात, त्याचा अर्थ देखील एकच होतो. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा सर्वात आधी भारतीय संस्कृतीप्रमाणे त्याला नमस्कार किंवा नमस्ते असं म्हणतो, त्यानंतर त्यांची चौकशी करतो, मात्र हे दोन्ही शब्द जरी एकच वाटत असले तरी त्यामध्ये फरक आहे. मात्र आपल्याला हा फरक माहीत नसल्यानं आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटतो, तेव्हा आपण नमस्ते किंवा नमस्कार यापैकी कोणत्याही एका शब्दाचा प्रयोग करतो, मात्र कोणाला नमस्कार म्हणायचं? कोणाला नमस्ते म्हणायचं? याचे देखील काही नियम आहेत.

जसं की दीन आणि दिन हे मराठी भाषेतील दोन शब्द आहेत, दीन याचा अर्थ गरीब असा होतो, तर दुसरा दिन जो आहे त्याचा अर्थ दिवस असा होतो, इथे फरक फक्त एका वेलांटीचा आहे, मात्र दोन्ही शब्दांचे अर्थच बदलून जातात, आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर रवी आणि रवि या दोन शब्दांचं देता येईल, यातील पहिला रवी जो आहे त्याचा अर्थ सूर्य असा होतो, मात्र दुसरा जो रवि शब्द आहे, त्याचा अर्थ दह्यामधून लोणी काढण्यासाठी जो रवि किंवा जे साधन वापरतात तो होतो. अशीच गंमत नमस्कार आणि नमस्ते या दोन शब्दांसंदर्भात आहे.

नमस्कार आणि नमस्तेमध्ये नेमका फरक काय? हा प्रश्न एका मुलाखतीदरम्यान देखील विचारला गेला होता. नमस्कार आणि नमस्ते हे देन्ही शब्द जरी एकच वाटत असले तरी त्यात खूप फरक आहे. जेव्हा आपल्यापेक्षा एखादा मोठा व्यक्ती आपल्याला भेटतो, तेव्हा आपण नमस्कार म्हटलं पाहिजे, आणि जेव्हा एखादा लहान व्यक्ती आपल्याला नमस्कार म्हणतो तेव्हा आपण त्याला नमस्ते म्हटलं पाहिजे. थोडक्यात काय तर आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीशी बोलताना नेहमी नमस्कार असं म्हणावं तर आपण जेव्हा आपल्यापेक्षा लहान व्यक्तीशी बोलत असतो तेव्हा नमस्ते या शब्दाचा उपयोग करावा हाच या दोन शब्दांमध्ये मुख्य फरक आहे.