JCB तर कंपनीचं नाव, मग ‘या’ मशीनला म्हणायचं तरी काय?

| Updated on: Mar 05, 2021 | 1:42 PM

ढोबळमानाने आपण या मशीनला 'जेसीबी' असं म्हणतो. मात्र, खरं पाहायचं झालं तर जेसीबी हे त्या मशीनचं नाव नाहीये. (jcb machine backhoe loader)

JCB तर कंपनीचं नाव, मग या मशीनला म्हणायचं तरी काय?
जेसीबी म्हणजेच बॅकहॉ लोडर
Follow us on

मुंबई : तुम्ही या मशीनला अनेक ठिकाणी पाहिलं असेल. खोदकाम करताना किंवा काही पाडताना या मशीनाचा सर्रास उपयोग केला जातो. या मशीनविषयी अनेकांना सुप्त आकर्षण असतं मशिनीची काम करण्याची पद्धत, दोन्ही बाजूने ऑपरेट करण्याची क्षमता यामुळे या मशीनची विशेष चर्चा असते. ढोबळमानाने आपण या मशीनला ‘जेसीबी’ असं म्हणतो. मात्र, खरं पाहायचं झालं तर जेसीबी हे त्या मशीनचं नाव नाहीये. जेसीबी हे मशीन तयार करणाऱ्या कंपनीचं नाव आहे. म्हणजे, या मशीनला कंपनीच्या नावाने ओळखले जात असून तिचं खरं नाव काही वेगळंच आहे. (what is the name of jcb machine backhoe loader)

आपण पाहतो की, एखादी मशीन तयार करणाऱ्या अनेक कंपन्या असतात. उदाहरणार्थ कार तयार करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. मारुती, मर्सिडीज, महिन्द्रा, टाटा अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या कार तयार करण्याचं काम करतात. तशाच प्रकारे जेसीबी ही कंपनी जमीन खोदणारी मशीन तयार करते. आपण त्याला ढोबळमाणाने जेसीबी मशीन म्हणतो. पण खरं पाहायचं झालं तर या मशीनचं खरं नाव जेसीबी नाहीये.

जेसीबीचं खरं नाव बॅकहॉ लोडर

मुळात जेसीबी हे कंपनीचं नाव असून जेसीबी असं नाव असलेल्या या मशिनला Backhoe Loader (बॅकहॉ लोडर) असं म्हणतात. बॅकहॉ लोडर ही मशीन तिच्या दोन्ही साईडने तेवढ्याच क्षमतेने काम करु शकते. या मशीनला चालवण्यासाठीसुद्धा चालकाकडे विशिष्ट कौशल्य असणे गरजेचे आहे. बॅकहॉ लोडर मशीनला एका साईडने स्टेअरिंग असतं तर दुसऱ्या बाजूने या मशीनवर क्रेनसारखे लिव्हर (lever) असतात. विशेषत: बॅकहॉ लोडर या मशिनीने जमीन खोदण्याचे, तसेच टणक वास्तू तोडण्याचे काम केले जाते. बॅकहॉ लोडर मशीनला रबरी टायर असतात. तचेस स्टॅबेलायझर लेग्सही या मशीनला असतात. स्टॅबेलायझर लेग्जच्या मदतीने ही मशीन डोंगराळ, खडकाळ जागेवर काम करु शकते.

जेसीबी काय आहे?

ढोबळ मानाने आपण ज्या मशीनला जेसीबी मशीन म्हणतो, ती जेसीबी नसून बॅकहॉ लोडर आहे. मग जेसीबी काय आहे? हा प्रश्नसुद्धा अनेकांना पडला असेल. तर जेसीबी हे एका कंपनीचं नाव आहे . या कंपनीचे देशात एकूण 5 ठिकाणी प्लांट्स असून एका ठिकाणी डिझाईन सेंटर आहे. या कंपनीतर्फे वेगवेगळ्या मशीन्स जवळपास 110 पेक्षा जास्त देशांना पुरवल्या जातात. या कंपनीकडून Backhoe loaders, Compactors, Excavators, generators, Mini Excavators, Skid Steer Loaders आदी यंत्रं तयार केली जातात.

इतर बातम्या :

OMG : 11 वीच्या विद्यार्थ्याने मेसेजवर केलं प्रपोज, उत्तर वाचून पोट धरून असाल

VIDEO | एका मुख्यमंत्र्याच्या नातीच्या लग्नात जेव्हा दुसरा माजी मुख्यमंत्री ठुमके लावतो…

(what is the name of jcb machine backhoe loader)