श्रीमंतांनी टाकलेल्या जुन्या पुराण्या वस्तू विकून श्रीमंत झाली महिला, टाकाऊतून टीकाऊ वस्तू तयार केल्या आणि महागात विकल्या

टाकाऊतून टीकाऊ वस्तू करुन कोणी श्रीमंत बनू शकते का ? हो हे खरे आहे एका महिलेने अशा पद्धतीने श्रीमंती गाठली आहे. या महिलेला साल २०२० मध्ये आर्थिक तंगी झाली होती, त्यानंतर तिला हा नवा व्यवसाय सुचला...

श्रीमंतांनी टाकलेल्या जुन्या पुराण्या वस्तू विकून श्रीमंत झाली महिला, टाकाऊतून टीकाऊ वस्तू तयार केल्या आणि महागात विकल्या
| Updated on: Sep 23, 2025 | 8:54 PM

दुसऱ्या नकोशा असल्याने टाकलेल्या वस्तूंचे भंगार उचलून कोणी श्रीमंत बनू शकतो का ? ही गोष्ट आश्चर्यकारक असली तरी खरी आहे. एका महिलेने टाकाऊतून टीकाऊ वस्तू तयार करीत श्रीमंती गाठली आहे. या महिलेने लोकांनी टाकून दिलेले जुने सामान रिपेअर करुन त्यांना महागड्या किंमतीत विकण्यास सुरुवात केली. या अमेरिकन महिलेने अलिकडेच त्यांची कहाणी जगाला सांगितली आहे.

टेक्सासला राहणाऱ्या ३० वर्षीय मॅगी मॅकगॉ यांनी कधी विचार केला नसेल की त्यांचे भविष्य दुसऱ्याने टाकलेल्या वस्तूंमुळे बदलेल. आज मॅगी टीकटॉक स्टार आहेत. त्यांचे TikTok वर १९ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत त्याला ४.५ कोटीहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. मॅगी तुटलेले फूटलेले फर्निचर आणि रस्त्याच्याकडेला पडलेल्या वस्तू उचलून घरी आणतात आणि त्यांना नवे रुप देतात आणि त्यांना विकून बक्कळ पैसे कमावत आहेत. त्यांना यातून वार्षिक सहा आकडी पैसा मिळत आहे.

कसा सुरु झाला हा प्रवास ?

मॅगी यांना २०२० मध्ये आर्थिक तंगीचा सामना करावा लागला. त्यावेळी तिने रस्त्याकडेला टाकलेले जुने टेबल उचलून घरी आणत त्याला कलर लावला. ती म्हणाली की तिने कधी पेंट ब्रश देखील हातात उचलला नव्हता. न कोणते पॉवर टूल वापरले होते. ती स्वत:ला कधीच क्रीएटीव्ह वगैरे मानत नव्हती. परंतू यानंतर तिचे आयुष्य बदलेले. तिचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले. काही वेळा तर ती दोन तासात श्रीमंत परिसरातून ६०० डॉलर ( सुमारे ५०,००० रुपये) पर्यंतचे सामान एकत्र करते. एका व्हिडीओत तिने आपल्या फॉलोअर्सना दाखवले की कसे श्रीमंत लोक चांगल्या वस्तू फेकून देत असतात. १८० पाऊंडचा ( २३० डॉलर) lemon wreath,६२ पाऊंडचा ( ८० डॉलर ) Ficus Ruby tree,एक पिंक डेस्क ज्याला तिने लगेच विकले. एक बेंच, ज्याला केवळ पाच मिनिटांत स्वच्छ करुन २५ डॉलरला विकले. अशा प्रकारे ती केवळ फर्निचर मोफत मिळवत नाहीत तर व्हिडिओच्या व्हूयजमधूनही पैसे कमावत आहे.एका स्पॉन्सर्ड रिल्ससाठी त्यांना सुमारे २०,००० डॉलरपर्यंत ब्रंड डील मिळते.

येथे पाहा व्हिडीओ –

इमानदारीमुळे मिळाली ओळख

मॅगी यांची सर्वात मोठी ताकद तिची इमानदारी आणि साधेपणा आहे. त्या मान्य करतात की त्यांच्या अनेक प्रोजेक्ट फेल गेले आहेत. अनेकदा फर्निचर खराब झाले. परंतू हे सर्व त्यांनी आपल्या फॉलोअर्सपासून लपवले नाही. त्यांचा हा साधेपणा आणि सच्चेपणा लोकांना आवडला. त्या विनोदी अंदाजात आपल्या जीवनातील चुका देखील शेअर करत असतात. उदाहरणार्थ त्यांनी एकदा चुकीने हॅप्पी एडींग मसाज बुक केला होता. त्या खुलेपणाने आपल्या ADHD संदर्भात देखील बोलतात. त्या आपल्या फॉलोअर्सना पटवून देतात की यशासाठी परफेक्ट होणे गरजेचे नाही.