महिलेने ओलांडल्या सर्व मर्यादा, भर चौकात साडी काढली अन्…; काही क्षणातच तो Video तुफान व्हायरल
काहींना हा व्हिडीओ भारतीय संस्कृतीचा अपमान वाटला आहे. तर काहींनी फक्त व्ह्यूजसाठी हा व्हिडीओ केल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे हिंदू संस्कृतीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

आपण साडी नेसून सर्वत्र मिरवावे, असे प्रत्येक महिलेला वाटते. त्यात परदेशात राहणाऱ्या महिला वर्गाला तर साडीचे विशेष कौतुक आहे. पण नुकतंच तुर्कीच्या एका गजबजलेल्या रस्त्यावर अचानक घडलेल्या एका घटनेनं जगभरातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका महिलेने तिच्या शॉपिंग बॅगेतून साडी काढून ती भर चौकात नेसायला सुरुवात केली आणि तिला पाहून सारेच अवाक् झाले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यासोबतच या व्हिडीओमुळे संस्कृतीचा सन्मान की निव्वळ लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
व्हिडीओत नेमकं काय?
या व्हिडीओच्या सुरुवातीला एक महिला ही तुर्कीतील गजबजलेल्या रस्त्यावर चालताना दिसत आहे. यावेळी ती काळ्या रंगाची लेगिंज्स, त्यासोबत लाल ब्लाऊज आणि हातात काही शॉपिंग बॅग्स घेऊन एका चौकात उभी राहते. अचानक तिच्या मनात काय येतं कुणास ठाऊक, ती भर रस्त्यातच कपडे बदलायला सुरुवात करते. यामुळे आजूबाजूला येणारे-जाणारे क्षणभर नेमकं काय चाललंय हे पाहण्यासाठी थांबतात. यानंतर ती भर कॅमेऱ्यात, लोकांच्या गर्दीत आधी पेटीकोट घालते. यानंतर मग ती आत्मविश्वासाने लाल रंगाची साडी बॅगेतून काढते आणि ती नेसायला सुरुवात करते.
महिला नेमकी कोण?
हा भर रस्त्यातील फॅशन शो पाहून काही लोक उत्सुकतेने तिच्याकडे पाहत राहतात. तर काही जणांना धक्काच बसतो. तिच्या आजूबाजूला असलेल्या अनेकांना हा प्रकार अजिबात आवडलेला दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नापसंतीचे भाव पाहायला मिळत होते. पण तिने कसलीही पर्वा न करता भर रस्त्यात पूर्ण साडी नेसली. ती इतक्यावरच थांबली नाही, तर तिने कॅमेऱ्यासमोर फोटोसाठी पोजही दिल्या. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून मोनिका कबीर नावाची बांगलादेशी व्लॉगर आहे, जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
हे खरंच लाजिरवाणं
मोनिका कबीरने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत ३ कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी याला भारतीय संस्कृतीचा अपमान असे म्हटलं आहे. एकाने या व्हिडीओवर ही भर रस्त्यावर भारतीय संस्कृतीची चेष्टा केली जात आहे, असे म्हटले आहे. तर एकाने एखाद्या संस्कृतीचा स्वीकार करणं चांगलं आहे, पण हे सगळं भर रस्त्यात करणं, हे थोडं नाही तर खूप जास्तच झालं. अशी कमेंट केली आहे. व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक कुठल्या थराला जात आहेत, अशी कमेंट काहींनी केली आहे. तर काहींनी तिला ताई, चेंजिंग रूममध्ये जा किंवा एखाद्या सार्वजनिक शौचालयात कपडे बदलून घे, कोणी काही बोलणार नाही. पण हे खरंच लाजिरवाणं आहे, असा सल्ला दिला आहे.
