मुलाला 25 लाखांचं पॅकेज तरीही मुलीने केलं रिजेक्ट! तरुणीच्या नकाराचं कारण जाणून तुम्हीही चक्रवाल
एका महिलेने वार्षिक २५ लाख रुपये कमावणाऱ्या पुरुषाचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला. या महिलेची पोस्ट व्हायरल झाली असून, सोशल मीडियावर त्यावरून चर्चा सुरू झाली आहे.

आजकाल लग्न टिकण्यापेक्षा त्याआधीच नाकारची घंटा वाजलेली दिसत आहे. आजच्या काळात लग्नसाठी फक्त चांगला पगार महत्त्वाचा नाही तर अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तरुणांना आता आपल्या होणाऱ्या पार्टनरकडून अनेक अपेक्षा असतात. फक्त पैसाच सर्वकाही नसते. समोरच्या व्यक्तीच्या आवडी-निवडी, लाइफस्टाइल एवढंच काय अगदी विचारसरणीसुद्धा आजकाल बघितली जाते. अशा पार्श्वभूमीवर एक स्टोरी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका ‘अरेंज मॅरेज’शी संबंधित हे प्रकरण आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. एका महिलेने लग्नाचा प्रस्ताव नाकारण्यामागचे कारण सांगितल्यानंतर, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लोकांमध्ये यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं काय घडलं?
त्या तरुणीनुसार तिला एका तरुणाचा लग्नाचा प्रस्ताव आला होता. त्याचे वार्षिक पॅकेज सुमारे २५ लाख रुपये होते. मात्र तिते सांगितले की, तिला पगाराचा काही घेणं देणं न्हवतं. कारण ती स्वतः कमाई करण्यास सक्षम होती. खरी अडचण त्या तरुणाच्या काही अपेक्षांमध्ये होती. अशा अपेक्षा ज्यांच्यासोबत राहण्यास ती तयार नव्हती.
का दिला लग्नाला नकार?
तिने त्या तरुणाचा लग्नाचा प्रस्ताव नाकारण्यामागचं कारण सांगितलं. तिने सांगितलं की, त्या तरुणाची लग्नानंतर अशी अपेक्षा होती की तिने तिने दिवसातून दोनदा स्वयंपाक करावा आणि त्याच्या पालकांसोबत एकाच घरात राहावे. या अटी तिला मान्य न्हवत्या. याव्यतिरिक्त, तिने हे ही सांगितले. त्या तरुणाची उंची ५ फूट ८ इंच होती आणि तिला अशी भीती वाटली की भविष्यात त्याचे केस गळू शकतात. तिने असेही सांगितले की, तो तरुण स्वतःला आपल्या आईच्या अत्यंत जवळचा असल्याचे सांगत होता, ज्यावरून तिला तो ममाज बॉय असल्याचे वाटले.
सोशल मीडिया X वरील एका युजरने त्या महिलेची ही पोस्ट शेअर केली, ज्यानंतर त्यावर कमेंट्सचा महापूर आला. काहींनी तिच्या निर्णयाचे समर्थन केले, तर काहींनी तिच्या निवडीवर आणि विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.