Viral Video : साडी नेसून अनवाणी धावली अन् 7 मिनिटांत रेस पूर्ण केली ; झारखंडच्या कविताच्या जिद्दीची सोशल मीडियावर चर्चा

झारखंडच्या रामगढमध्ये होमगार्ड भरतीच्या तयारीदरम्यान कविताने साडी आणि अनवाणी पायांनी 1600 मीटर धाव पूर्ण केली. दोन मुलांच्या संगोपनासाठी नोकरी मिळवण्याची तिची धडपड सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली.

Viral Video : साडी नेसून अनवाणी धावली अन् 7 मिनिटांत रेस पूर्ण केली ; झारखंडच्या कविताच्या जिद्दीची सोशल मीडियावर चर्चा
jharkhand viral video
| Updated on: Oct 07, 2026 | 4:40 PM

इतिहास साक्षी आहे जेव्हा एखादी स्त्री जिद्दीला पेटते तेव्हा परिस्थिती बदलण्याचीही ताकद ठेवते. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवण्याची ताकद बाळगते. ते म्हणतात ना बाल हट्ट,स्त्री हट्ट आणि आबाल हट्ट यांपुढे कोणी काहीही करू शकत नाही. अशाच एका संघर्षाची कहाणी, एका जिद्दीची कहाणी, त्या एका स्वप्नाची कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

झारखंडच्या गावातील स्त्रिया घरदार,चुल आणि मूल सोडून आपल्या स्वप्नांच्या मागे धावल्या. झारखंडच्या रामगढमध्ये होमगार्ड भरतीच्या तयारीसाठी महिलांनी 1600 मीटर धावण्याची शर्यत पूर्ण केली. कोणी अनवाणी तर कोणी फाटक्या कपड्यांनी तर कोणी चक्क साडीवर रेस पुर्ण केली. ते पाहून सोशल मीडियावर त्यांच्या जिद्दीची कहाणी चर्चेचा विषय ठरली आहे. यात विशेष म्हणजे कविता देवी नावाची एक महिला साडी आणि अनवाणी पायांनी ही धावण्याची स्पर्धा पूर्ण करताना दिसली.

Loading...

रामगढमध्ये होमगार्डच्या 284 पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. ही प्रक्रिया 24 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या प्रक्रियेत उमेदवारांकडून शारीरिक चाचणीची तयारी करून घेतली जात आहे. याचा तयारीचा भाग म्हणून 1600 मीटर धावण्याचा सराव आणि ट्रायल घेण्यात आला.

या ट्रायलमध्ये अनेक महिला सहभागी झाल्या. काही माहिला आणि स्पोर्ट्स शूजमध्ये धावत होत्या तर काहींनी साडी आणि चप्पल घालून मैदान गाजवलं . कविता देवी यांच्याकडे रनिंग शूज किंवा ट्रॅकसूट नसल्याने तिने साडी नेसून अनवाणी पायांनी धावण्याचा निर्णय घेतला. तिने त्या प्रचंड तापलेल्या जमिनीवर अनवाणी पायांनी धावून 1600 धाव पूर्ण केली.

 

 

कविता देवी या रामगढमधील सोसो गावातील रहिवासी असून ती विधवा आहेत. त्यांच्या दोन मुलांचं संगोपन करण्यासाठी तिला होमगार्डची नोकरी मिळवणं गरजेचं आहे. आता नाही तर कधीच नाही हे बहुदा तिने ठरवलं असावं आणि रेस पुर्ण केलीच. दुसऱ्यांच्या जीवावर जगण्यापेक्षा तिला आपल्या मेहनतीने एखादी नोकरी मिळवून मुलांच संगोपन करायचं होतं. परिस्थिती चांगली नसल्याने तिला शूज आणि धावण्याचे कपडे घेण्याचे पैसे नव्हते. रेस 8 मिनिटांत पुर्ण करायची होती. पण तिने साडी नेसूनही ही रेस 7 मिनिटांत पुर्ण केली.

तिच्या धावण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर अनेकांनी तिच्या या जिद्दीचं कौतुक केलं. स्थानिक रनिंग ग्रुप आणि काही वरिष्ठांनी मिळून तिला धावण्यासाठी लागणारे शूज आणि इतर साहित्य भेट म्हणून दिल.

रामगढमधील या भरतीमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण आहे. त्याशिवाय विधवा आणि घटस्पोटित महिलांसाठी अतिरिक्त 5 टक्के आरक्षणाची तरतूद आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांसाठी ही भरतीची मोठी संधी आहे. आता 24 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या भरतीत त्यांच्या या मेहनतीची खरी कसोटी लागणार आहे.

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us