AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजी विकणाऱ्या महिलेने UPI पेमेंटसाठी QR कोड सोशल मीडियावर चर्चा

सध्या सोशल मीडियावर एका भाजी विक्रेत्या महिलेचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांनी केलेला जुगाड अनेकांना आवडला आहे, आजीच्या त्या जुगाडाला लोकांनी कमेंट करुन दाद दिली आहे.

भाजी विकणाऱ्या महिलेने UPI पेमेंटसाठी QR कोड सोशल मीडियावर चर्चा
video viralImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Sep 02, 2023 | 9:26 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर (social media) कधी काय व्हायरल होईल हे कुणीचं सांगू शकत नाही. म्हणजे लोकांना कधी काय आवडेल हे सुध्दा कोणी सांगू शकत नाही. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती आतापर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सध्याचा व्हिडीओ (video viral) हा लोकांच्या अधिक पसंतीला पडला आहे. सध्या तुम्ही दुकानात कुठलीही गोष्ट खरेदी करण्यासाठी गेला, तर पहिलं तिथं ऑनलाईन पेमेंट व्यवस्था आहे का ? हे पाहतो. कारण सगळीकडं आणि UPI पेमेंट लोकं करीत आहे.  प्रत्येक व्यक्तीचा QR कोड वेगळा आहे. भाजी विक्रेत्या एका महिलेचा क्यूआर (QR)कोड चांगलाचं चर्चेत आहे.

त्यामुळे त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला

तुम्ही कुठल्याही दुकानात गेल्यानंतर तुम्हाला तिथल्या दुकानाच्या एका कोपऱ्यात ठेवलेला क्यआर कोड पाहायला मिळेल. त्याचबरोबर दुकानाच्या टेबलावरती सुध्दा क्यूआर कोडची मशीन पाहायला मिळते. सध्या आजीबाईंचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आजीबाई रस्त्यात भाजी विकत आहेत. ते ठिकाण कोणतं आहे अद्याप निश्चित झालेलं नाही. त्या आजीबाईनी वजनाच्या पाठीमागे क्यआर कोड लावला आहे. त्यामुळे त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ 12.6 मिलियन लोकांनी पाहिला

सध्याचा व्हिडीओ maharashtra.farmer या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. काही वेळात हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ 12.6 मिलियन लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर व्हिडीओला 1.4 मिलियन लाइक्स सुध्दा मिळाले आहेत. त्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये स्मार्ट मावशी असं म्हटलं आहे. सध्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

Follow Us
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट