महिलेचे हरवलेले एअरपॉड चक्क पोटात सापडले, वाचा नेमके काय घडले?

| Updated on: Nov 03, 2022 | 10:41 PM

घटना घडली ती अशी की, पोटात खूप दुखायला लागले म्हणून महिलेने पेनकिलर गोळी घेण्याचा विचार केला. ती एवढी विचारात मग्न होती की तिने आपण पेनकिलर गोळी घेतोय की दुसरे काही आहे याची पडताळणी केली नाही.

महिलेचे हरवलेले एअरपॉड चक्क पोटात सापडले, वाचा नेमके काय घडले?
महिलेचे हरवलेले एअरपॉड सापडले पोटात
Image Credit source: social
Follow us on

जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक अजबगजब घटना घडतात. त्यातील काही घटना या अपघाताने असतात तर काही घटना लोकांच्या निष्काळजीपणातून घडलेल्या असतात. बरेच लोक काही वस्तूंच्या इतके प्रेमात पडलेले असतात की त्यांचा वापर अनेकदा चुकीचाही होतो. अशाच बेफिकीर वागण्यातून एका महिलेच्या बाबतीत घडलेला प्रकार सोशल मीडियामध्ये खूप व्हायरल झाला आहे. महिलेने केलेल्या एका चुकीमुळे तिच्या जीवावरच धोका उद्भवला होता.

घटना घडली ती अशी की, पोटात खूप दुखायला लागले म्हणून महिलेने पेनकिलर गोळी घेण्याचा विचार केला. ती एवढी विचारात मग्न होती की तिने आपण पेनकिलर गोळी घेतोय की दुसरे काही आहे याची पडताळणी केली नाही.

पोटात गोळीऐवजी एअरपॉड गेला

महिलेच्या याच बेफिकिरीमुळे पोटात पेनकिलरची गोळी जाण्याऐवजी तिने चक्क ॲपलचा एअरपॉड गिळला. पोटातील वेदना थांबण्याऐवजी आणखी त्रास का होतोय म्हणून ती डॉक्टरकडे गेली. त्यावेळी करण्यात आलेल्या एक्स-रेमधून धक्कादायक उलगडा झाला.

हे सुद्धा वाचा

महिलेने स्वतः दिली चुकीची कबुली

पेनकिलरऐवजी एप्पलचा एअरपॉड घेतल्याची कबुली स्वतःच दिली आहे. तिने सोशल मीडियामध्ये हा किस्सा शेअर केला आहे. आपल्या हातून घडलेल्या चुकीची पुनरावृत्ती होऊ नये, या घटनेपासून इतरांनी धडा घ्यावा आणि स्वतःची पुरेशी काळजी घ्यावी असा संदेश देण्यासाठी महिलेने आपला किस्सा फेसबुक ट्विटर यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.

महिलेच्या पोस्टवर विविध प्रतिक्रिया

महिलेच्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी तिच्या निष्काळजीपणावर टीका केली आहे तर काही युजर्स तिच्या पोस्टचे कौतुक पण करत आहेत. तिने इतरांना सावध करण्यासाठी सोशल मीडियात पोस्ट केल्यामुळे तिला दाद दिली जात आहे.

शक्यतो लहान मुलांच्या बाबतीत अशा प्रकारचा निष्काळजीपणा दिसून येतो. मात्र सध्या मोबाईलमध्ये मश्गुल झालेली तरुणाईसुद्धा बेफिकीर वागत आहे. त्यातून अशा प्रकारची चूक घडू शकते हे उघडकीस आले आहे.