Video | राजस्थानी महिलेचा घराच्या छतावर जलवा, हुबेहुब गोविंदासारखं थिरकण्याचा प्रयत्न

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हासुद्धा एका महिलेचा आहे. या महिलेचे इन्स्टाग्रामवर हजारोंच्या संख्येने फॉलोवर्स असून तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Video | राजस्थानी महिलेचा घराच्या छतावर जलवा, हुबेहुब गोविंदासारखं थिरकण्याचा प्रयत्न
women viral dance
| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 11:02 PM

मुंबई : सोशल मीडियावर तरुण-तरुणी चांगलेच सक्रिय असतात. असे असले तरी तरुणांच्या तुलनेत तरुणींचे चाहते मोठ्या प्रमाणात असल्याचे आपल्याला दिसते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हासुद्धा एका महिलेचा आहे. या महिलेचे इन्स्टाग्रामवर हजारोंच्या संख्येने फॉलोवर्स असून तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. (women dancing on song of actor Govinda video went viral on social media)

महिला करतेय गोविंदासारखा डान्स

सध्या व्हायरल होत असलेली महिला ही राजस्थान राज्यातील आहे. ही महिला तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डान्स करतानाचे व्हिडीओ अपलोड करत असते. सध्या व्हायरल असलेल्या व्हिडीओमध्ये ही महिला अभिनेता गोविंदाने डान्स केलेल्या ‘मखना’ या हिंदी गीतावर थिरकत आहे.

नेटकरी महिलेच्या डान्सचे दिवाने

ही महिला हुबेहुब गोविंदासारखा डान्स करण्याचा प्रयत्न करते आहे. काही प्रमाणात ती यामध्ये यशस्वीसुद्धा झाली आहे. महिलेचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही महिला अतिशय बिनधास्त आणि आनंदात नाचत असल्यामुळे नेटकरी तिच्या डान्सचे दिवाने झाले आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा radioactiveblossom नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून लोक या व्हिडीओवर उत्स्फूर्तपणे कमेंट्स करत आहेत.

इतर बातम्या :

Video | लग्न मंडपात नवरदेवाचा शहाणपणा, हुंडा मागताच लोकांनी खुर्चीला बांधलं, नंतर जे झालं ते पाहाच !

नेपाळच्या पंतप्रधानांचं वादग्रस्त विधान, म्हणतात योगाची उत्पत्ती नेपाळमध्ये, नेटकऱ्यांकडून केपी शर्मा ओली ट्रोल

Video | तरुणी थाटात पेट्रोल पंपावर आली अन् म्हणते 20 रुपयाचं पेट्रोल द्या, नंतर जे झालं ते एकदा पाहाच

(women dancing on song of actor Govinda video went viral on social media)