अन्नपदार्थ शिजवण्यासाठी कुकरची शिट्टी मिळेना, मग महिला सैनिकांनी थेट बंदुकच वापरली, पाहा नेमकं काय केलं ?

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठाला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठऱला आहे. यामध्ये दोन महिला सैनिक दिसत आहेत. या महिलांनी आपल्या चेहऱ्याला झाकून घेतले आहे. तसेच त्यांच्यासमोर एक कुकर दिसत आहे. या कुकुरमध्ये महिला सैनिक अन्न शिजवत आहेत.

अन्नपदार्थ शिजवण्यासाठी कुकरची शिट्टी मिळेना, मग महिला सैनिकांनी थेट बंदुकच वापरली, पाहा नेमकं काय केलं ?
viral video

मुंबई : सोशल मीडियावर रोजच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ अतिशय मजेदार तर काही व्हिडीओ आपल्या आश्चर्यचकित करून टाकतात. सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ तर अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये महिला सैनिकांनी केलेलं जुगाड थक्क करणारं आहे. महिला सैनिकांनी कुकरची शिट्टी म्हणून बंदुकीचा उपयोग केला आहे.

महिला सैनिकांनी केलं भन्नाट जुगाड

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठाला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठऱला आहे. यामध्ये दोन महिला सैनिक दिसत आहेत. या महिलांनी आपल्या चेहऱ्याला झाकून घेतले आहे. तसेच त्यांच्यासमोर एक कुकर दिसत आहे. या कुकरमध्ये महिला सैनिक अन्न शिजत असल्याचं दिसतंय. अन्न शिजवताना मात्र एक अडचण निर्माण झाली आहे. या कुकरला शिट्टी नसल्यामुळे त्यांना जेवण तयार करण्यास उशीर होत आहे. शेवटी याच महिला सैनिकांनी एक जबरदस्त जुगाड केलं आहे.

बंदुकीचा वापर कुकरची शिट्टी म्हणून केला

या महिला सैनिकांनी त्यांच्याजवळ असलेली बंदुकीचा वापर शिट्टी म्हणून केला आहे. एका महिला सैनिकाने बंदुक थेट कुकरवर ठेवली आहे. तसेच दुसऱ्या महिलेने वाफ बाहेर जाऊ नये म्हणून कापडाच्या मदतीने कुकर झाकून घेतले आहे. तसेच व्हिडीओतील दोन्ही महिलांनी त्यांचा चेहरासुद्धा झाकून घेतलाय. चेहऱ्याला वाफ लागू नये म्हणून सैनिकांनी तसे केल्याचे दिसतेय.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by JUGAAD (@jugaadu_life_hacks)

सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

सैनिकांचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. एका बंदुकीचा शिट्टी म्हणून वापर केल्यामुळे सैनिकांनी लावलेल्या जुगाडाची चर्चा सुरु आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला उत्स्फूर्तपणे शेअरसुद्धा केले आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तुम्हाला इन्स्टाग्रामवर jugaadu_life_hacks या अकाऊंटवर पाहता येईल.

इतर बातम्या ;

बहिणीसाठी भावाचा स्वीटहार्ट डान्स, नेटकरी म्हणाले, डान्स पाहून आम्हाला सुशांतसिंहची आठवण झाली

Video: ऑस्ट्रेलियात थंड पाण्यात फसलेल्या कांगारुची 2 व्यक्तींकडून सुटका, सुटकेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल

Video: बाईकवर स्टंट करण्याचा प्रयत्न, पाय सटकला आणि महाशयांचं तोंड फुटलं, व्हिडीओ व्हायरल

(women soldiers use gun as whistle for pressure cooker video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI