बहिणीसाठी भावाचा स्वीटहार्ट डान्स, नेटकरी म्हणाले, डान्स पाहून आम्हाला सुशांतसिंहची आठवण झाली

या व्हायरल व्हिडिओमध्ये वधूचा भाऊ दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान यांच्या गाण्यांवर नाचत आहे. या व्हिडिओमध्ये नाचणाऱ्या मुलाचे नाव गुणवीत सिंह डांग आहे.

बहिणीसाठी भावाचा स्वीटहार्ट डान्स, नेटकरी म्हणाले, डान्स पाहून आम्हाला सुशांतसिंहची आठवण झाली
व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, वधूचा भाऊ बॉलिवूडच्या स्वीटहार्ट या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

इंटरनेटवर लग्न आणि लग्नातील किश्श्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, वधूचा भाऊ बॉलिवूडच्या स्वीटहार्ट या गाण्यावर नाचताना दिसत आहे. मुलीच्या भावाचं हे जबरदस्त नृत्य सर्वांना आवडत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये वधूचा भाऊ दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान यांच्या गाण्यांवर नाचत आहे. या व्हिडिओमध्ये नाचणाऱ्या मुलाचे नाव गुणवीत सिंह डांग आहे. ( bride-brother-amazing-dance-moves-to-sushant-singh-rajput-song-watch-viral-video )

हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक वेळा पाहिला गेला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. तसेच अनेक लोक सुशांत सिंह राजपूतची आठवण काढत आहेत. तुमच्या माहितीसाठी गुणवीत सिंह डांगने हा डान्स आपल्या बहिणीसाठी केला आहे, जिचं लग्न होणार आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘हे तुझ्यासाठी आहे.’ त्याने आपली बहीण तान्यालाही टॅग केले आहे.

पाहा व्हिडीओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Gunveet Singh Dang (@gunveetdang)

गुणवीत सिंग डांगचा हा व्हिडिओ सर्वांना खूप आवडलेला दिसत आहे. सोशल मीडिया अनेक युजर्स या व्हिडिओवर कमेंट्स करुन आणि इमोजीजद्वारे प्रेम व्यक्त करत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाइक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. गुणवीत सिंह डांगचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या इतर पेजवरही शेअर करण्यात आला आहे.

एका नेटकऱ्याने लिहलं की, ‘हा डान्स मला ये जवानी है दिवानी मधील रणबीर कपूरची आठवण करून देतो.’ दुसऱ्याने लिहिलं ‘हा डान्स पाहिल्यानंतर मला सुशांत भाईची आठवण झाली,’ तिसऱ्याने लिहिलं की,’सुशांत सिंह राजपूतचा हा चित्रपट आणि या चित्रपटाची सर्व गाणी उत्तम आहेत’. याशिवाय अनेकांनी इमोजीजद्वारे व्हिडीओ आवडल्याचं सांगितलं. स्वीटहार्ट हे गाणे 2018 मध्ये रिलीज झालेल्या केदारनाथ चित्रपटातील आहे. सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान यांच्यावर हे गाणं चित्रित झालं आहे.

हेही पाहा:

Video: ऑस्ट्रेलियात थंड पाण्यात फसलेल्या कांगारुची 2 व्यक्तींकडून सुटका, सुटकेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल

पातेल्यात झोपवून बाळाला पोलिओ डोससाठी आणलं, कारण ऐकून तुम्हीही या पित्याचं कौतुक कराल!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI