Video: ऑस्ट्रेलियात थंड पाण्यात फसलेल्या कांगारुची 2 व्यक्तींकडून सुटका, सुटकेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल

एक कांगारू ऑस्ट्रेलियाच्या थंड पाण्यात अडकतो, त्याला बाहेर पडावं हे कळत नाही. आणि तेवढ्यात तिथं असलेली 2 माणसं त्या कांगारुला पाण्याबाहेर काढतात.

Video: ऑस्ट्रेलियात थंड पाण्यात फसलेल्या कांगारुची 2 व्यक्तींकडून सुटका, सुटकेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल
स्ट्रेलियातल्या कॅनबेरामधील बर्ले ग्रिफिन लेकजवळचा हा व्हिडीओ आहे.

दररोज काही ना काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओवर व्हायरल होत आहे. ज्यात एक कांगारू ऑस्ट्रेलियाच्या थंड पाण्यात अडकतो, त्याला बाहेर पडावं हे कळत नाही. आणि तेवढ्यात तिथं असलेली 2 माणसं त्या कांगारुला पाण्याबाहेर काढतात. सध्या नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूप आवडताना दिसत आहे. ( kangaroo-trapped-in-the-cold-waters-of-australia-two-person-did-the-rescue-video-viral-hero-animal-video-emotional-video)

व्हायरल होणारा व्हिडिओ मंगळवार सकाळचा आहे. ऑस्ट्रेलियातल्या कॅनबेरामधील बर्ले ग्रिफिन लेकजवळचा हा व्हिडीओ आहे. यात पाहू शकता की, या तळाच्या मध्ये एक कांगारु आहे, जो खूप घाबरलेला आहे. अतिथंड पाण्यामुळे त्याला काय करावं हे सुचत नाही आहे. तेवढ्यात दोन लोक हळूहळू घाबरलेल्या कांगारुजवळ येतात. आणि त्या कांगारुला जवळ घेतात. कांगारुलाही जाणवतं की दोघे त्याला वाचवण्यासाठीच आले आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये या दोघांना ‘हिरो’ म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ:


हे दोघे कांगारुजवळ पोहचल्यानंतर कांगारु थोडे आवाज काढू लागतं. ते त्याला शांत करतात, संधी मिळताच ते या कांगारुला उचलतात आणि कडेवर घेऊन पाण्याबाहेर काढतात. जमिनीवर असलेला तिसरा व्यक्ती कांगारुला जमिनीवर आणण्यासाठी मदत करतो. त्यानंतर या कांगारुचं अंग पुसलं जातं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्युलियन अॅबॉट या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

व्हायरल होणाऱ्या क्लिपला जवळपास 2 हजार रि-ट्वीट आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत. लोक व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही शेअर करत आहेत. एकाने लिहलं की, ‘या दोन लोकांनी एक अद्भुत काम केलं आहे’ दुसऱ्याने लिहिले, ‘प्राणी त्यांची वेदना व्यक्त करू शकत नाहीत, पण या दोन लोकांप्रमाणे आपण त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत’ या दोघांनाही लोक हिरो म्हणत आहेत.

हेही पाहा:

पातेल्यात झोपवून बाळाला पोलिओ डोससाठी आणलं, कारण ऐकून तुम्हीही या पित्याचं कौतुक कराल!

Video: खारुताईची चालाखी पाहून थक्क व्हाल, असा व्हिडीओ जो पाहून नेटकरी खारुताईच्या प्रेमात पडले!

 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI