Video: खारुताईची चालाखी पाहून थक्क व्हाल, असा व्हिडीओ जो पाहून नेटकरी खारुताईच्या प्रेमात पडले!

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओही असाच आहे, ज्यात एक मांजर खारुताईला पकडण्याचा प्रयत्न करते. पण, मांजरीसोबत असं काही होतं की भांबावून जाते.

Video: खारुताईची चालाखी पाहून थक्क व्हाल, असा व्हिडीओ जो पाहून नेटकरी खारुताईच्या प्रेमात पडले!
शेवटी खारुताई थेट मांजरीच्या अंगावरच चढते. तिच्या पाठीवर बसते.

सोशल मीडियावर प्राण्यांच्या व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. काही इतके गोंडस आणि मजेदार असतात, की त्यांना पुन्हा पुन्हा बघावं वाटते. खारुताईचे व्हिडीओ असेच काहिसे असतात. आकारने लहान पण गोंडस आणि तितकीच खोडकर. विशेष म्हणजे त्या इतक्या चपळ असतात, की त्यांना पकडणं भल्याभल्यांना शक्य होत नाही. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओही असाच आहे, ज्यात एक मांजर खारुताईला पकडण्याचा प्रयत्न करते. पण, मांजरीसोबत असं काही होतं की भांबावून जाते. (cat-was-running-to-catch-the-squirrel-then-squirrel-sat-on-the-cats-back-watch-full-video-animal-video-funny-video)

व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की मांजर खारुताईला पकडण्याचा प्रयत्न करत आहे आणि पुन्हा पुन्हा तिचा पाठलाग करत आहे. मांजर तिला खारुताईला इतका त्रास देते की, ती तिच्या त्रासाला कंटाळते. शेवटी खारुताई थेट मांजरीच्या अंगावरच चढते. तिच्या पाठीवर बसते. आता मांजरीला कळत नाही की खारुताईला पकडावं तरी कसं? आता खारुताई तिच्या पाठीवर आहे, पण मांजरीला ते माहितीच नाही, ती चारही बाजूला पाहते, पण तिला खारुताई दिसत नाही. खरं म्हणजे, हे खारुताईचं पिल्लू आहे, जे अतिशय लहान आहे. मोठी खारुताई तर या मांजरीच्या कधीच हाती लागली नसते, पण या पिल्लालाही जन्मत: चालाखी मिळाली आहे. त्याचाच वापर ते करताना पाहायला मिळतं आहे.

व्हिडीओ पाहा:

प्रत्येकाला हा व्हिडिओ खूप आवडलेला दिसतो आहे. मांजर आणि खारुताईचा हा व्हायरल व्हिडिओ @hopkinsBRFC21 नावाच्या पेजवरून ट्विट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून खारुताईचं डोकं सर्वात भन्नाट असतं हे म्हणणं चूक ठरणार नाही. व्हिडिओमध्ये, खारुताईने सिद्ध केलं आहे की, ती मांजरींपेक्षा अधिक वेगवान आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. लोक खारुताईची स्तुती करत आहेत.

एका युजरने यावर कमेंट केली की, ‘चांगली रणनीती आहे.’ दुसऱ्याने लिहिले, ‘ही खारुताई स्मार्ट झाली आहे’, तिसऱ्याने लिहिले, ‘खारुताई आणि मांजरीचा हा व्हिडिओ खूप मजेदार आहे.’ याशिवाय बहुतेक युजर्सने हसणारे इमोजी शेअर केले आहे.

हेही पाहा:

Video: बाईकवर स्टंट करण्याचा प्रयत्न, पाय सटकला आणि महाशयांचं तोंड फुटलं, व्हिडीओ व्हायरल

शकिराच्या आवाजात पिझ्झाची ऑर्डर, तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल, शकिराही झाली या तरुणीची फॅन

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI