शकिराच्या आवाजात पिझ्झाची ऑर्डर, तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल, शकिराही झाली या तरुणीची फॅन

एका पॉप गायिकेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ही गायिका पिझ्झा ऑर्डर करताना शकिराचा आवाजात गाणं म्हणत पिझ्झाची ऑर्डर देत आहे.

शकिराच्या आवाजात पिझ्झाची ऑर्डर, तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल, शकिराही झाली या तरुणीची फॅन
तुम्ही जर डोळे मिटून हा व्हिडीओ ऐकला तर तुम्हाला शकिराच गात असल्याचा भास होईल
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 10:53 AM

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही, असाच एका पॉप गायिकेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ही गायिका पिझ्झा ऑर्डर करताना शकिराचा आवाजात गाणं म्हणत पिझ्झाची ऑर्डर देत आहे. हा व्हिडीओ खुद्द शकिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ खूप आवडल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. तुमच्या माहितीसाठी, ज्या गायिकेचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ती अमेरिकन आयडॉलचं सिझन 12 ची सेमीफायनलिस्ट आहे, तिचं नाव आहे शुबा वेदुला. हा व्हिडीओ सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय बनतो आहे. ( girl-sings-like-shakira-while-ordering-pizza-on-call-watch-funny-viral-video-shuba-vedula)

तुम्ही जर डोळे मिटून हा व्हिडीओ ऐकला तर तुम्हाला शकिराच गात असल्याचा भास होईल, पण ही शकिरा नसून शुबा वेदुला आहे. शकिराला हा व्हिडीओ इतका आवडला आहे की तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. पिझ्झा मागवण्याची शुबाची ही पद्धत अनेकांना आवडली आहे. विशेष गोष्ट म्हणजे, ज्याला शुबा पिझ्झाची ऑर्डर देत आहे, त्यालाही आधी कळत नाही की हे काय सुरु आहे. तो शुबाला अनेक प्रश्न विचारतो, ज्याची सर्व उत्तरं शुबा शकिराच्या आवाजात आणि गाण्याच्या अंदाजातच देते. या पिझ्झा कर्मचाऱ्यालाही हे खूप आवडतं, आणि तो विचारतोही की तू शकिरा आहेस का? त्यालाही शकीराच बोलत असल्याचा भास होतो.

व्हिडीओ पाहा:

View this post on Instagram

A post shared by Shakira (@shakira)

ही क्लिप पाहिल्यानंतर शकिरानेही तिच्यासोबत रिल्स बनवलं आहे आणि हा व्हिडीओ आवडल्याचं सांगितलं आहे. कॅप्शनमध्ये शकिराने लिहलं आहे की,’ हॅलो शुभा, मी तुमची ऑर्डर घेऊ शकते का?’

शकिराने शेअर केलेल्या या व्हिडीओवर लोकांना कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकजण शुबाची तारीफ करताना दिसत आहे. ज्यांना शुबा माहितंही नव्हती, त्यांना या व्हिडीओमुळे ती माहित झाली आहे. कमेंट करताना एका युजरने लिहिलं, ‘शुबा जी, तुम्ही भन्नाट आहात’ दुसऱ्याने लिहिले, ‘हा व्हिडिओ खूपच भारी आहे’ तिसऱ्याने लिहिले, ‘शकीरा आणि शुबाच्या आवाजात फरकच वाटत नाही. याशिवाय अनेकजणांनी इमोजी वापरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शकिराने हा व्हिडिओ पोस्ट केल्यापासून तो आतापर्यंत तब्बल 14 लाख लाईक्स मिळाले आहेत. शुबानेही या पोस्टवर कमेंट करत शकिराचे आभार मानले आहेत, आणि भविष्यात कधी सोबत काम करण्याची संधी मिळाली तर नक्की करेन असं म्हटलं आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ आम्हाला नक्की कळवा.

हेही पाहा:

नॅशनल क्रश रश्मिकावर फॅन्स भडकले, अंडरविअरची जाहिरात केल्याने रश्मिका मंदाना ट्रोल

रस्त्यावर पार्क केलेल्या ई -स्कूटरला लागली आग, व्हिडीओ पाहणारे लोक म्हणाले – ‘ही तर डास दूर करण्याची मशीन!’

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.