नॅशनल क्रश रश्मिकावर फॅन्स भडकले, अंडरविअरची जाहिरात केल्याने रश्मिका मंदाना ट्रोल

रश्मिकाने बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलसोबत अंडरवेअरची जाहिरात केली आहे. जाहिरातीत, विकी कौशल त्याच्या अंडरवेअरला फ्लॉन्ट करताना दिसत आहे, ज्यावर रश्मिका आकर्षित होताना दिसते.

नॅशनल क्रश रश्मिकावर फॅन्स भडकले, अंडरविअरची जाहिरात केल्याने रश्मिका मंदाना ट्रोल
सोशल मीडियावर रश्मिकासाठी विविध प्रकारच्या कमेंट्स येत आहेत, ज्यात नेटकरी नाराज दिसत आहेत.


नॅशनल क्रश आणि साउथची अभिनेत्री रश्मिका मंदाना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण आता कोणत्याही चित्रपटाबद्दल नाही, तर बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलसोबत शूट केलेल्या एका जाहिरातीमुळे. या जाहिरातीमुळे आधी चाहते रश्मिकावर जीव ओतायचे, तिचं तोंड भरुन कौतुक करायचे, तेच चाहते आता तिच्यावर टीका करत आहेत. नक्की काय घडलं आहे नक्की, हेच आपण पाहुया.

अंडरवेअरची जाहिरात करणं महागात

रश्मिकाने बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलसोबत अंडरवेअरची जाहिरात केली आहे. जाहिरातीत, विकी कौशल त्याच्या अंडरवेअरला फ्लॉन्ट करताना दिसत आहे, ज्यावर रश्मिका आकर्षित होताना दिसते. साऊथ सेंसेशन असलेल्या रश्मिकाचं हेच वागणं तिच्या चाहत्यांना पटलेलं नाही. त्यामुळे तिच्यावर नेटकऱ्यांकडून टीका सुरु झाली आहे.

फॅन्सकडून रश्मिका ट्रोल:

 

 

सेलिब्रेटींचे फॅन त्यांच्या प्रत्येक कृतीवर दाद देत असतात.त्यांची प्रत्येक चांगली कृती, त्यांची कला, त्यांचं चांगलं वागणं याचं ते नेहमी कौतुक करतात. मात्र, जेव्हा एकादी सेलिब्रेटी फॅन्सच्या मनाविरुद्ध कृती करते, तेव्हा त्यांना टीकेचा सामनाही करावा लागतो

ज्या जाहिरातीमुळे वाद निर्माण झाला ती जाहिरात:

 

सोशल मीडियावर रश्मिकासाठी विविध प्रकारच्या कमेंट्स येत आहेत, ज्यात नेटकरी नाराज दिसत आहेत. एका नेटकऱ्यांने कमेंट केली आहे की, ‘ हे लोक पैशासाठी काहीही करू शकतात. जाहिरात उद्योग इतक्या खालच्या पातळीवर येईल याची कल्पनाही करू शकत नाही.’ एकाने लिहिलं आहे की, ‘प्रिय रश्मिका मंदन्ना, मी तुझी जाहिरात पाहिली, ती माझ्यासाठी खूप निराशाजनक होती. मी तुझ्याकडून ही अपेक्षा कधीच केली नाही. तू हे करू शकत नाही, कारण तू राष्ट्रीय क्रश आहेस,’ रश्मिकाला या जाहिरातीवरुन ट्रोल केलं जात आहे, मात्र रश्मिकाने अद्याप या सगळ्यावर मौनच पाळणं पसंत केलं आहे.

हेही वाचा:

नवज्योतसिंह सिद्धूचा राजीनामा, अर्चना पुरण सिंह ट्रेंड, द कपिल शर्मा शो मधील खुर्ची धोक्यात असल्याचे फनी मिम्स

भारताचा हिटमॅन रोहित शर्मा रावळपिंडत कसा? रोहितच्या डुप्लिकेटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI