रस्त्यावर पार्क केलेल्या ई -स्कूटरला लागली आग, व्हिडीओ पाहणारे लोक म्हणाले – ‘ही तर डास दूर करण्याची मशीन!’

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, इलेक्ट्रिक स्कूटर रस्त्याच्या कडेला उभी आहे आणि त्यातून धूर निघत आहे. (An e-scooter parked on the road caught fire, video viewers saying - 'This is a mosquito repellent machine!')

रस्त्यावर पार्क केलेल्या ई -स्कूटरला लागली आग, व्हिडीओ पाहणारे लोक म्हणाले - 'ही तर डास दूर करण्याची मशीन!'
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: VN

Sep 30, 2021 | 3:33 PM

मुंबई : इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicles) हे रस्त्यांचं भविष्य मानलं जात आहे. याचे कारण हे पर्यावरणासाठी चांगलं मानलं जाते. त्याच्या लोकप्रियतेचे आणखी एक कारण म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची किंमत. तिसरे कारण म्हणजे त्यांचं मेंटेनन्स. पण हे तुमच्यासाठी किती सुरक्षित आहे यासंबंधीचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, इलेक्ट्रिक स्कूटर रस्त्याच्या कडेला उभी आहे आणि त्यातून धूर निघत आहे, त्याची सीट उचलल्यानंतर धूर थांबत नाही. यानंतर, पांढरा धूर आगीत बदलतो. जे पाहून लोक स्वतःला वाचवण्यासाठी स्कूटरवरून पळून जाऊ लागतात. याशिवाय, इतर अनेक लोक होते जे घटनास्थळी गाडीची आग विझवण्याऐवजी तिथे उभे राहून व्हिडीओ बनवत होते.

पाहा व्हिडीओ

हा आश्चर्यकारक व्हिडिओ @in_patrao ने शेअर केला आहे. ज्यासह त्याने कॅप्शन लिहिले, ‘ई-स्कूटर खरेदी करा आणि त्रास सहन करा.’ बातमी लिहीपर्यंत या व्हिडिओला 17 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासह, बरेच लोक या व्हिडिओवर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ पाहून खूप आश्चर्य वाटले. एका वापरकर्त्याने कमेंट केली आणि लिहिलं, ‘या धुरामुळे वायू प्रदूषणाचा कोटा पूर्ण झाला आहे.’ या व्यतिरिक्त, इतर अनेक वापरकर्त्यांनी मजेदार टिप्पण्या दिल्या.

संबंधित बातम्या

भारताचा हिटमॅन रोहित शर्मा रावळपिंडत कसा? रोहितच्या डुप्लिकेटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

नवज्योतसिंह सिद्धूचा राजीनामा, अर्चना पुरण सिंह ट्रेंड, द कपिल शर्मा शो मधील खुर्ची धोक्यात असल्याचे फनी मिम्स

पुन्हा एकदा चर्चेत आली रानू मंडल, तिच्याच शैलीत गायलं ‘Manike Mage Hithe’ गाणं – पाहा व्हिडीओ

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें