Video: बाईकवर स्टंट करण्याचा प्रयत्न, पाय सटकला आणि महाशयांचं तोंड फुटलं, व्हिडीओ व्हायरल

अनेक तरुण स्टंट करण्याच्या नादात काहीतरी अपघात करुन घेतात, पण हाच अपघात व्हिडीओ पाहणाऱ्यांसाठी विनोद ठरत असतो.

Video: बाईकवर स्टंट करण्याचा प्रयत्न, पाय सटकला आणि महाशयांचं तोंड फुटलं, व्हिडीओ व्हायरल
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत हा तरुण बाईकवर वेगवेगळे स्टंट करण्यात मश्गूल आहे.

आजचे तरुण वेगळं करण्यासाठी काय करतील हे सांगता येत नाही. लवकर प्रसिद्ध होण्यासाठी त्यांना काहीतरी वेगळं करु वाटतं, आणि ते करतातही. मात्र, हे करताना बऱ्याचदा त्यांच्याकडून काही चुका होतात, आणि मग याच चुका सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ बनतात. अनेक तरुण स्टंट करण्याच्या नादात काहीतरी अपघात करुन घेतात, पण हाच अपघात व्हिडीओ पाहणाऱ्यांसाठी विनोद ठरत असतो. ( viral-video-of-man-stunt-on-suddenly-disturbed-balance-and-fell-down-funny-video-accident-video )

अनेकवेळा धोकादायक स्टंट करताना अपघात होतात, लोक जखमी होतात, काही अपघातात तर जीवही जातो. आता सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहा. एक तरुण वाहत्या रस्त्यावर बाईक चालवत आहे आणि त्यावर स्टंट करत आहे. कधी तो बाईकवर उभा राहतो, कधी पुढचं चाक उचलण्याचा प्रयत्न करतो, मात्र हे करतानाच तो एक चूक करुन बसतो.

व्हिडीओ पाहा:

 

View this post on Instagram

 

A post shared by Aw.aw.iq (@aw.aw.iq)

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत हा तरुण बाईकवर वेगवेगळे स्टंट करण्यात मश्गूल आहे. मागे गाडीत असलेला व्यक्ती त्याचे हे स्टंट आपल्या मोबाईलमध्ये शूट करत आहे. कधी हा तरुण बाईक उडवतो, कधी बाईकवर उभा राहतो, कधी हात सोडून गाडी चालवतो, पण हे करत असतानाच तो एक मोठी चूक करतो. तो भरधाव असलेल्या बाईकवरुन उतरतो आणि तिच्यासोबत पळण्याचा प्रयत्न करतो. आणि हाच स्टंट या तरुणाच्या जीवावर येतो. कारण, या तरुणाचा स्पीड तेवढा नाही की जेवढा या बाईकचा आहे, त्यामुळे त्याचा तोल जातो आणि जबरदस्त अपघात होतो.

या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणावर कमेंट्स करत आहेत. लोकांना कळत नाही आहे की, या त्याच्या कारनाम्यावर हसावं की त्याच्या अपघातावर दु:ख व्यक्त करावं आणि इतरांना सांगावं असं करु नका. एकाने या व्हिडीओवर लिहलं, असे स्टंट करण्यापूर्वी खूप जास्त प्रॅक्टिसची गरज असते. तर अजून एकाने लिहलं, आता हा पुढच्यावेळी असे स्टंट करताना शंभरवेळा विचार करेल.

हेही पाहा:

शकिराच्या आवाजात पिझ्झाची ऑर्डर, तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल, शकिराही झाली या तरुणीची फॅन

नॅशनल क्रश रश्मिकावर फॅन्स भडकले, अंडरविअरची जाहिरात केल्याने रश्मिका मंदाना ट्रोल

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI