AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! नागपूरमध्ये पिकनिकला गेलेल्या 3 जणांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

नागपूरमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पिकनिकला गेलेल्या 3 जणांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनं त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून, परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मोठी बातमी! नागपूरमध्ये पिकनिकला गेलेल्या 3 जणांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू
नागपुरात तीन जणांचा बुडून मृत्यू Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 07, 2026 | 6:30 PM
Share

नागपूरमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात असलेल्या महादेव घाट इथे पिकनिकला गेलेल्या तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. कन्हान नदीमध्ये बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. कामठी कँटोन्मेंट परिसरात असलेल्या महादेव घाट येथे ही घटना घडली आहे. कामठी आणि नागपूर येथील १२ ते १३ जण पिकनिकसाठी महादेव घाटावर गेले होते. पिकनिक सुरू असताना पोहोण्यासाठी हे तिघे पाण्यात उतरले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यानं हे तिघे बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये यश आलं नाही. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर जिल्ह्यातल्या कामठी तालुक्यातील  महादेव घाट इथे ही घटना घडली आहे. नागपूर आणि कामठी येथील १२ ते १३ जण पिकनिकसाठी महादेव घाट इथे आले होते. परंतु सध्या बाहेर प्रचंड गर्मी आहे, त्यामुळे या  तिघांना पाण्यात पोहोण्याचा मोह आवरला नाही, आणि ते पोहोण्यासाठी कन्हान नदीमध्ये उतरले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

पिकनिकचा आनंद घेत असतानाच ही घटना घडली आहे. तिघे जण पोहण्यासाठी नदीच्या पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडू लागले. दरम्यान ही घटना लक्षात येताच तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा वाचवण्यात यश आलं नाही. रोहित नागदेवे (३३) , गौतम अंबादे (३१) आणि चैतन्य अंबादे (6 ) वर्ष अशी या घटनेमधील मृतांची नावं आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, बचाव पथकाने या तिघांचे मृतदेह नदीबाहेर काढले आहेत, त्यानंतर  शवविच्छेदनासाठी हे मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात