AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Tour : 80 दिवसात सात खंड पालथे घातले, 81 वर्षांच्या आज्ज्यांचा पराक्रम

जर तुमच्यात इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कोणत्याही वयात कोणतेही धाडस करू शकतो. 80 वर्षांच्या दोन आज्जींनी केवळ 80 दिवसात जगप्रदक्षिणा पूर्ण केली आहे.

World Tour : 80 दिवसात सात खंड पालथे घातले, 81 वर्षांच्या आज्ज्यांचा पराक्रम
ellie and sandyImage Credit source: socialmedia
| Updated on: Apr 10, 2023 | 1:41 PM
Share

World Tour : जर तुमच्यात जिद्द असेल तर तुम्हाला जगातील कोणतेही अवघड काम करू शकता. मग तुमचे वय तुमच्या आड येत नाही की तुमची शारीरिक क्षमता. आज तुम्हाला वयाच्या 80 व्या वर्षी जगप्रवास करणाऱ्या दोन आजींची कहाणी ऐकणार आहात. या दोघींची गेल्या 20 वर्षांपासून एकमेकींची मैत्री आहे. दोघींचे पती वारले आहेत. त्यामुळे त्यांनी जग प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. नॉर्थ टेक्सासमध्ये राहणाऱ्या या दोघी जणींचा उत्साह पाहून तुम्हालाही त्यांना सलाम करावासा वाटेल. सॅंडी हेजेलिप आणि अ‍ॅली हॅम्बी या दोघींची ही कहाणी प्रेरणादायी आहे.

सॅंडी या पेशाने डॉक्टर आहेत. तर अ‍ॅली या डॉक्युमेंटरी फोटोग्राफर आहेत. या दोघी घनिष्ट मैत्रिणी आहेत. न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीनूसार 23 वर्षांपूर्वी या दोघींची एकमेकींशी ओळख झाली होती. जाम्बिया येथे एका मेडीकल मिशनवर असताना दोघींची भेट झाली होती. त्यानंतर त्याची मैत्री वाढतच गेली.

जेवताना जग फिरण्याची आयडीया सुचली..

दोघी एकत्र जेवत असताना त्यांचा जग फिरायला जाण्याची आयडीया सुचली. त्यांनी ठरविले 80 वयोमान आपण गाठले आहेच तर 80 दिवसात जग फिरण्याचा संकल्प त्यांनी सोडला. मग काय बॅगा भरल्या आणि त्या प्रवासाला निघाल्या. 11 जानेवरीपासून त्यांनी आपल्या प्रवासाला सुरूवात केली. त्यांनी अर्जेंटीना पासून नॉर्थ पोलपर्यंत प्रवास केला. या प्रवासात दोघींनी अशा स्थळांना भेटी दिल्या जेथे सर्वसामान्य पर्यटक जात नाहीत.

त्यांनी प्रवास खर्च वाचविण्यासाठी बचतीचे अनेक उपाय केले. छोट्या हॉटेलात राहील्या. जर तुम्ही फिरायलाच निघाला आहात तर महागड्या हॉटेलात उतरून काय उपयोग. काही वेळा तर वेळ नसल्याने त्या एअरपोर्टवरच झोपल्या. तसेच छोट्या बाजारात पेठेत शॉपिंग केल्याने त्यांना स्वस्तात मस्त वस्तूही विकत घेता आल्या.

या ऐतिहासिक स्थळांना दिल्या भेटी

सॅंडी आणि अ‍ॅली यांनी प्रवासात अनेक रहस्यमयी ठीकाणांना भेटी दिल्या. त्यांनी रहस्यमयी ईस्टर बेट पाहीले. याशिवाय त्यांनी नोट्रेडम, बकिंघम पॅलेस आणि रोमन कोलोजियम समेत अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. आफ्रीकेच्या हॅम्बी झांझीबार बेटावर गेल्या, इजिप्तच्या पिरामिड्सना भेट दिली. अंटार्टीकाला जाऊन बर्फात मस्ती केली तेथे पेंगविन पाहीले. भारत, नेपाळ, बाली, जपान,रोम आणि लंडन आदी देश पाहीले.

Follow Us
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत