Most Expensive Mango: लिलावात काय किंमतीला गेला बघा…जगातला सर्वात महाग आंबा!

Expensive mango: या आंब्याला लिलावात एवढी मोठी किंमत मिळाली की त्याने जगातील सर्वात महागड्या आंब्याचा किताब मिळाला. या आंब्याचे झाड दोन वर्षांपूर्वी एका स्थानिक व्यक्तीने लावले होते. चला जाणून घेऊया या आंब्या बद्दल.

Most Expensive Mango: लिलावात काय किंमतीला गेला बघा...जगातला सर्वात महाग आंबा!
Miyazaki mango
| Updated on: Jun 06, 2023 | 10:15 AM

कोलकाता: सध्या आंब्याचा हंगाम सुरू असून भारतातील अनेक भागात आंब्याचे विविध प्रकार आढळतात. पण पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील एक आंब्याचे झाड प्रचंड चर्चेत आहे. या आंब्याला लिलावात एवढी मोठी किंमत मिळाली की त्याने जगातील सर्वात महागड्या आंब्याचा किताब मिळाला. या आंब्याचे झाड दोन वर्षांपूर्वी एका स्थानिक व्यक्तीने लावले होते. चला जाणून घेऊया या आंब्या बद्दल.

ही घटना पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या आंब्याच्या प्रजातीचे नाव ‘मियाजाकी’ असे आहे. बीरभूमच्या दुबराजपूर येथील स्थानिक मशिदीत हा आंबा लावण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी हा आंबा इथे लावण्यात आल्याचे सांगितलं जातंय. दरम्यान, हा आंबा जगातील सर्वात महागडा आंबा असल्याची माहिती नुकतीच ग्रामस्थांना मिळाली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याचा लिलाव केला.

कमाईचा आकडा त्यांनी जाहीर केला नसला तरी आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत २ लाख ७० हजार रुपये प्रतिकिलो असल्याचे सांगितले जात आहे. अशा तऱ्हेने एक किलोत ३ आंबेही असले तरी एका आंब्याची किंमत सुमारे ९० हजार रुपये होईल, असा अंदाज बांधता येतो. झारखंडमधील जामतारा येथेही या आंब्याची काही रोपे लावण्यात आली आहेत.

जपानमध्ये साधारणपणे आढळणाऱ्या या आंब्याचे वजन ३५० ग्रॅम आहे. मूळचा जपानमधील मियाझाकी शहरातून येणारा हा आंब्याचा वाण एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान पिकवला जातो. मियाझाकी आंबे पिकत असताना तो लोकांना आश्चर्यचकित करतो. विशेषत: त्याचा रंग सर्वांनाच आश्चर्यचकित करतो. त्याचा रंग जांभळा असतो. तथापि, एकदा ते पूर्णपणे पिकले की ते लाल होते.

सध्या तो प्रचंड चर्चेत आहे. दोन वर्षांपूर्वी परदेशात गेलेल्या सय्यद सोना नावाच्या व्यक्तीने तिथून मियाजाकीचे रोप आणले, जे त्याने मशिदीच्या आवारात लावले होते. आता त्याचे झाड झाले असून झाडावर ८ आंबे आहेत. या आंब्याचे खरे नाव तैयो-नो-टोमागो असल्याचे सांगितले जाते.