Video | झाड तोडायचंय? दरवाजा तोडायचाय? मशिन, कटर कशाला हवं, 12 वर्षांची मुलगी आहे ना..

या मुलीचं नाव थोडसं नाही, तर भरपूर कठीण आहे. एवनिका साजवाकास असं या मुलीचं नाव आहे. वय आहे अवघ बारा वर्ष. या मुलीचे काही व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आहेत.

Video | झाड तोडायचंय? दरवाजा तोडायचाय? मशिन, कटर कशाला हवं, 12 वर्षांची मुलगी आहे ना..
पंच मारुन झाड तोडणारी मुलगी
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 6:09 PM

बारा वर्ष. हे वय म्हणजे आपल्याकडे फुल तिकीट काढायचं वय. पण याच वयात कुणी फक्त ठोसा मारुन झाड पाडवत असेल, दरवाडे तोडत असेल, तर? आश्चर्य वाटणारच! वयवर्ष 12 असणारी एक मुलगी चक्क हेच करते. तिच्या ठोसा इतका ताकदवर आहे, की विचारता सोय नाही. या मुलीला पाहून ही मुलगी म्हणजे मुक्काबाजच आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.

कोण आहे ती?

या मुलीचं नाव थोडसं नाही, तर भरपूर कठीण आहे. एवनिका साजवाकास (Evnika Saadvakass) असं या मुलीचं नाव आहे. वय आहे अवघ बारा वर्ष. या मुलीचे काही व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आहेत. एखाद्या बॉक्सिंग चॅम्पियनसारखी ही मुलगी झाडावर प्रहार करत सुटते आणि झाडच पाडवून टाकते. हेत तिनं एका दरवाज्याच्या बाबतीतंही केलंय.

रक्तातच बॉक्सिंग

एवनिका रुसमध्ये राहते. गेल्या अनेक वर्षांपासून ती बॉक्सिंग करते आहेत. सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडीओ गाजले आहेत. तिच्या वडिलांकडून तिला बॉक्सिंग खेळण्याची प्रेरणा मिळाली असून तेच तिला ट्रेनिंगही देत आहेत.

वयाच्या चौथ्या वर्षापासूनच एवनिका बॉक्सिंगचं प्रशिक्षण आपल्या वडिलांकडून घेतेय. एखापेक्षा एक जबरदस्त पंच देण्यामध्ये ती माहीर आहे. तिचं कौशल्य आणि टॅलेंट पाहून तिला वडिलांनी ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. एवनिकानं एक जागतिक विक्रमही केलाय.

कमाल, धम्माल!

एका मिनिटांत ती तब्बल 654 पंच मारु शकते. तिच्या नावावर हा खतरनाक असा रेकॉर्ड आहे. दरवाडा, झाड यासारखी एकापेक्षा एक मजबूत गोष्टी एवनिका सहज तोडू शकते. दरम्यान, अनेकांनी तिचा झाडावर पंच मारतानाचा व्हिडीओ पाहून झाडाला कशाला मारतेस, असा टोलाही लगावला आहे. अर्थात हा वादाचा विषय असला तरिही या पोरीचं टॅलेंट पाहून सगळेच चकीत झाले आहे. अवघ्या बारा वर्षांच्या या मुलीनं कमालच केली आहे.

पाहा व्हिडीओ –

दरवाजा कसा तोडला ते ही एकदा पाहा…

इतर बातम्या –

Video | गायीकडून दूध जास्त मिळावं म्हणून या शेतकऱ्यांनं केलेला जुगाड ‘सुपर से भी ऊपर’ आहे!

Video | #srivalli | मटकीला मोड नाय, Pushpa मधील स्रीवल्लीच्या मराठी वर्जनला तोड नाय! अमरातवीच्या पोरांची कमाल