Video | गायीकडून दूध जास्त मिळावं म्हणून या शेतकऱ्यांनं केलेला जुगाड ‘सुपर से भी ऊपर’ आहे!

व्हर्च्युअल रियालिटी गॉगला प्रयोग गायीनं जास्त दूध देण्यासाठी करण्यात आल्याचं ऐकून कुणालाही आश्चर्य़ वाटले. पण खरंच असा प्रयोग करण्यात आला आहे. नवल म्हणजे हा प्रयोग यशस्वीदेखील झाला आहे.

Video | गायीकडून दूध जास्त मिळावं म्हणून या शेतकऱ्यांनं केलेला जुगाड 'सुपर से भी ऊपर' आहे!
तुर्कीतील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

जुगाड ही खूप थोर गोष्ट आहे. कोणत्याही बाबतीत जुगाड करायला ना जाती-धर्माच्या सीमा आहेत, ना राज्य आणि देशांच्या! भारतातले लोक जुगाडू आहेतच. पण इतरही देशातले काही कमी नाही. असाच एक प्रकार समोर आला आहे. चक्क गायीनं जास्त दूध द्यावं म्हणून एकानं भारीच जुगाड केलाय. या जुगाडची सर्वत्र चर्चा रंगली आहे. दरम्यान, हा जुगाड पाहून अनेकांनी हा प्रयोग ‘सुपर से भी उपर’ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

काय केलं… काय?

आपल्या गायीनं जास्त दूध द्यावं म्हणून एकानं चक्क गायीला व्हर्च्युअल गॉगल घातलेत. व्हर्च्युअल रियालिटी गॉगला प्रयोग गायीनं जास्त दूध देण्यासाठी करण्यात आल्याचं ऐकून कुणालाही आश्चर्य़ वाटले. पण खरंच असा प्रयोग करण्यात आला आहे. नवल म्हणजे हा प्रयोग यशस्वीदेखील झाला आहे. गाय अधिक सकारात्मकही झाली आणि जास्तीचं दूधही देऊ लागली.

तुर्कीमध्ये इज्जत कोकाक नावाच्या एका माणसानं हा भारी जुगाड यशस्वी करुन दाखवलाय. गायीला व्हर्च्युअल रियालिटी गॉगल लावण्यात आले. त्यामुळे गायीला असा भास झाला की जणू काही आपण मोकळ्या मैदानातच गवत चरायला आलोय. आपण मोकळ्या मैदानात, वावरात असल्याचा फिल या गायीला आला आहे.

किती क्षमता वाढली?

या प्रयोगामुळे इज्जत कोकाक या तुर्कीमध्ये शेतकऱ्याला फायदा झालाय. गायीन तब्बल 22 लीटर जास्त दूध दिल्याचं इज्जत कोकाक यांनी सांगितलंय. हिरवळ आणि बाहेरील वातावरणातील आवाजांनी प्रसन्न झालेली गायीची दूध देक्ण्याची क्षमता कमालीची वाढली आहे. दरम्यान, जे व्हर्च्युअल रियालिटी गॉगल गाईला लावण्यात आले ते खास तयार करुन घेतले गेले आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखील हे नवे आणि खास डिझाईन असलेले गॉगल्स तयार करण्यात आले. त्यानंतर हा अजब प्रयोग करण्यात आला. गायींना लाल किंवा हिरवा रंग दिसत नाही. त्यामुळे त्याप्रमाणे अनेक बदल सॉफ्टवेअरमध्ये करण्यात आल्याचंही इज्जत नावाच्या शेतकऱ्यानं सांगितलंय.

पाहा हा खास व्हिडीओ –

इतर बातम्या –

Video | #srivalli | मटकीला मोड नाय, Pushpa मधील स्रीवल्लीच्या मराठी वर्जनला तोड नाय! अमरातवीच्या पोरांची कमाल

Video | पेट्रोल पंपावर तरुणाची स्टंटबाजी, पण रात्रीच्या अंधारात भलतंच घडलं, पाहा थरारक व्हिडीओ


Published On - 5:26 pm, Mon, 10 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI