धन्य ते गजराज, धन्य ती भक्ती! कमाल व्हिडीओ

विश्वास ठेवणे सोपे नाही कारण येथे हत्ती मनुष्याप्रमाणे देवाची पूजा करताना दिसत आहे.

धन्य ते गजराज, धन्य ती भक्ती! कमाल व्हिडीओ
elephant bowing head
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 18, 2022 | 5:35 PM

कधी कधी इंटरनेटवर खूप मजेशीर आणि भन्नाट व्हिडिओज पाहायला मिळतात. विशेषत: प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ, जे लोकांचं भरपूर मनोरंजन करतात. अनेकदा प्राण्यांच्या व्हिडिओंमध्ये काहीतरी मजेदार आणि अद्वितीय घटना घडतात. आजकाल असाच एक व्हिडिओ पाहायला मिळाला आहे जो मोहक आहे.

प्राण्यांच्या भावना समजून घेणे सोपे नाही. मनुष्य प्रत्येक गोष्ट बोलून किंवा आपल्या कृतीने व्यक्त करत असला, तरी प्राण्याला हे करणं शक्य नसतं.

परंतु काही प्राणी अतिशय बुद्धिमान असतात. दरम्यान, हत्तीचा एक अद्भुत व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यावर विश्वास ठेवणे सोपे नाही कारण येथे हत्ती मनुष्याप्रमाणे देवाची पूजा करताना दिसत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडिओ एका मंदिराचा वाटतोय, जिथे एक हत्तीही भक्तासोबत उपस्थित असतो आणि तो मनापासून पूजा करताना दिसत आहे.

ही क्लिप पाहून मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड केल्याचं दिसतंय. जो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ ट्विटरवर @VertigoWarrior नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 13 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, 2200 हून अधिक लोकांनी व्हिडीओ पसंत केलाय.

यासोबतच लोकांनी यावर कमेंट करत आपला फीडबॅक दिला आहे. एका युझरने लिहिले की, ‘या व्हिडिओने खरंच माझं मन जिंकलं. त्याचवेळी आणखी एका युझरने लिहिले, ‘माणसाने त्यांच्याकडून शिकण्याची गरज आहे, आश्चर्यकारक!. या व्हिडिओवर अनेक युझर्सनी आपला फिडबॅकही दिला आहे.