VIDEO | शेतकऱ्याचा जुगाड, डिझेलशिवाज चालतोय ट्रॅक्टर, पाहा व्हायरल व्हिडीओ

Tractor Trending Video | सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये सीएनजीवर चालणार ट्रॅक्टर पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हा जुगाड पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

VIDEO | शेतकऱ्याचा जुगाड, डिझेलशिवाज चालतोय ट्रॅक्टर, पाहा व्हायरल व्हिडीओ
cng tractor
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2023 | 1:51 PM

मुंबई : कधी काय व्हायरल होईल हे कुणीचं सांगू शकत नाही. सोशल मीडियावर सध्या एक गोष्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यामध्ये एका शेतकऱ्याने जुगाड (Jugaad Video) करुन सीएनजी (CNG Tractor) बसवला आहे. हा ट्रॅक्टर पाहायला अनेकांची गर्दी होत आहे. सोशल मीडियावर जुगाड केलेले व्हिडीओ पाहायला लोकांना अधिक आवडतात. सध्याचा व्हिडीओ सुध्दा तसाचं आहे. शेतकरी वर्ग हा व्हिडीओ (trending video) पाहिल्यापासून अधिक खूष आहे. हा जुगाड कसा केला अशी अनेकांना शंका आहे. अनेक नेटकऱ्यांनी शेतकऱ्याला जुगाड पाहून सलाम केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला जुगाड आवडला की नाही आम्हाला नक्की कळवा.

सध्याचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. @IndianFarmer_ नावाच्या खात्यावरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओला शेअर करीत असताना, लिहीलं आहे की, हा ट्रॅक्टर पेट्रोलवरती चालत नाही, डिझेलवरती चालत नाही…शेतकऱ्याचा जुगाड पाहून अनेकांना धक्का बसला आहे. ५२ सेंकदाच्या त्या व्हिडीओमध्ये सीएनजी ट्रॅक्टर चालवणाऱ्या व्यक्तीची एकाने मुलाखत घेतली आहे. चालकाने खूप हुशारी दाखवत मुलाखतदाराला उत्तरं दिली आहेत.

ट्रॅक्टरच्या दोन्ही बाजूला टायरच्यावरती सीएनजीच्या बसवला आहे. विशेष म्हणजे दोन्ही सीएनजीच्या टाक्या रॉकेट सारख्या दिसत आहेत. ज्या व्यक्तीने चालकाची मुलाखत घेतली आहे. त्याला चालकाने खणखणीत उत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पटलावडा येथील एमपीचे शेतकरी देवेंद्र परमार यांनी हा जुगाड केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.

सोशल मीडियावर जुगाड केलेले व्हिडीओ अनेकांना पाहायला आवडतात. त्याचबरोबर लोकं सुध्दा असे जुगाड केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर शोधत असतात. सध्याचा व्हिडीओ शेतकऱ्यांच्या फायद्याचा असल्यामुळे लोकं या व्हिडीओ अधिक पाहत आहेत.