बॉयफ्रेंडच्या घरी गेली, भावी सासऱ्याला पाहताच बसला झटका ! ती गोष्ट आठवताच मान खाली घातली… काय घडलं त्या घरात ?

सर्वांनाच आयुष्यात असं नातं हवं असतं जे आपल्या हृदयाच्या खूप जवळचं असेल. कधीकधी अशी व्यक्ती शोधण्यासाठी बराच वेळ लागतो, परंतु कधीकधी आपण भाग्यवान असल्यास, आपल्याला आपला सोलमेट सहज सापडतो. एका तरूणीलाही तिचा जोडीदार सापडला खरा पण..

बॉयफ्रेंडच्या घरी गेली, भावी सासऱ्याला पाहताच बसला झटका ! ती गोष्ट आठवताच मान  खाली घातली... काय घडलं त्या घरात ?
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jul 25, 2025 | 3:04 PM

आपल्या सर्वांनाच आपल्या आयुष्यात असं नातं हवं असतं जे आपल्या हृदयाच्या खूप जवळचं असेल. कधीकधी अशी व्यक्ती शोधण्यासाठी बराच वेळ लागतो, परंतु कधीकधी आपण भाग्यवान असल्यास, आपल्याला आपला सोलमेट सहज सापडतो. एका तरूणीसोबतही असंच काहीसं घडलं.तिचं आयुष्य आनंदाने भरलेलं होतं आणि तिला भविष्यातही ते असेच ठेवायचे होते. पण याच दरम्यान तिच्यासोबत काहीतरी विचित्र घडलं. नक्की काय झालं तिच्यासोब,जाणून घेऊया.

या तरूणीला डेटिंग ॲपवर एक मुलगा भेटला,पाहता पाहतं त्याचं नातं सुरू झालं, एकमेकांबद्दल ते खूप सीरियस होते. त्यांचा एकमेकांशी लग्न करण्याचा देखील विचार होता. तेव्हाच त्या मुलाने त्या तरूणीची, आपल्या आई-वडिलांशी भेट घालून दिली. मात्र ज्याक्षणी त्या तरूणीने तिच्या भावी सासऱ्याला पाहिलं, तिला झटकाच बसला. आता आपलं नातं कोणत्या दिशेने न्यावं अशी दुविधा, असा प्रश्न सध्या तिच्या मनात आहे.

भावी सासऱ्याला पाहताच सुन्न झाली तरूणी

द सनच्या वृत्तानुसार, Relatively Blonde या नावाच्या पॉडकास्टमध्ये तरूणीने तिची विचित्र कहाणी लिहिली. तिने सांगितले की काही महिन्यांपूर्वी ती टिंडरवर एका मुलाला भेटली आणि त्यांचं नाते गंभीर झाले.मूळची स्कॉटलंडची मुलगी ग्लासगोमध्ये तिच्या प्रियकरासोबत होती, तेव्हाच तिच्या जोडीदाराने तिला त्याच्या पालकांशी ओळख करून देण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचे पालक जवळच्याच एका बारमध्ये होते. जेव्हा ती तरूणी तिच्या जोडीदारासह तिथे पोहोचली, तेव्हा तिला तिच्या भावी सासऱ्याला पाहून धक्का बसला.

तुम्हाला आधीही कुठे पाहिलंय…

त्या तरूणीला पाहिल्यावर त्या मुलाचे वडील तर काही बोलले नाहीत पण थोड्याच वेळात त्या तरूणीला सगळं काही आठवलं. ती त्यांना ख्रिसमसच्या काळात याच बारमध्ये भेटली होती हेही तिच्या लक्षात आलं. मात्र ते ( मुलाचे वडील) वयापेक्षा खूपच लहान दिसत असल्याने, ती तरूणी त्याच्याकडे आकर्षित झाली आणि तिने त्या व्यक्तीला डेटही केलं होतं. संपूर्ण घटना आठवताच तिला खूप लाज वाटली आणि आता ती त्या मुलाशी असलेले नाते कसे तोडायचे याचा विचार करत आहे. एकीकडे ती तरूणी तिच्या सध्याच्या नात्याबद्दल गंभीर तर आहे, तर दुसरीकडे तिचा भूतकाळ तिला या नात्याातून मागे खेचत आहे.