New Labour Code : आठवड्यात 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टीचा सर्वे, फीडबॅकही मजेदार

| Updated on: Sep 03, 2022 | 12:30 AM

ब्रिटननंतर आता कॅनडा आणि अमेरिकेसह युरोपातील अनेक देशांमध्ये 4 दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी या संकल्पनेची चाचणी सुरू होणार आहे. मात्र, भारतातील तज्ज्ञांना याबाबत अद्याप काही सकारात्मक दिसलेले नाही.

New Labour Code : आठवड्यात 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टीचा सर्वे, फीडबॅकही मजेदार
आठवड्यात 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टीचा सर्वे
Image Credit source: Google
Follow us on

नवी दिल्ली : आठवड्यातून चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी या फॉर्म्युलावर जगभरात चर्चा सुरू झाली आहे. भारतात हा नियम (Rule) लागू करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन लेबर कोड (New Labour Code) बनवले आहेत. पण त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. केंद्र सरकारची इच्छा आहे की, सर्व राज्यांनी नवीन कामगार संहिता एकाच वेळी लागू करावी. ही संकल्पना लोकांचे वैयक्तिक जीवन आणि कार्य यांच्यात समतोल साधण्यासाठी आणली जात आहे. भारताशिवाय इतर अनेक देशही चार दिवस काम आणि तीन दिवस विश्रांतीचा फॉर्म्युला (Formula) सुरू करणार आहेत. याबाबत ब्रिटनमध्ये नुकताच अभ्यास सुरू झाला आहे. 4 दिवस चालणाऱ्या पायलट कार्यक्रमात अनेक क्षेत्रातील कंपन्या सहभागी झाल्या आहेत. सहा महिन्यांपासून ते सुरू झाले आहे.

यूकेमध्ये सुरु आहे रिसर्च

जून 2022 मध्ये ब्रिटनमध्ये सुरू झालेल्या या पायलट प्रोजेक्टचे अर्धा वेळ म्हणजे तीन महिने उलटले आहेत. आठवड्यातून 4 दिवस काम करण्याची संकल्पना सकारात्मक असल्याचे अभ्यासात सहभागी कंपन्यांचे मत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंटेंट आणि डिजिटल मार्केटिंग कंपनीचे सह-संस्थापक गॅड्सबी पीट यांच्या मते, चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी या संकल्पनेत काही नकारात्मक मुद्दे आहेत. परंतु सकारात्मक मुद्दे अधिक आहेत.

गॅडस्बी पीटच्या मते, आठवड्यातून चार दिवस काम केल्याने उत्पादनात 5 टक्के घट झाली आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या आनंदात 50 टक्क्यांनी वाढ झाली असून, त्यामुळेच त्यांच्यातील उत्तम प्रतिभा बाहेर आली आहे.

हे सुद्धा वाचा

तीन दिवस सुट्टीचा फायदा

बिझनेस लीडर्स आणि स्ट्रॅटेजिस्टचा एक ग्रुप ‘द 4-डे वीक ग्लोबल’ या वेबसाईटवरील सर्व्हेक्षणाच्या आधारे हा दावा करण्यात आला आहे. वेबसाइटनुसार, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 63 टक्के कंपन्यांचे असे मत आहे की, चार दिवस काम आणि तीन दिवस रजा या संकल्पनेने उत्तम प्रतिभा पहायला मिळत आहे. दुसरीकडे, 78 टक्के कर्मचारीही या संकल्पनेमुळे कमी तणावात असल्याचे दिसून आले.

अनेक देशांमध्ये चाचणी सुरू होणार

ब्रिटननंतर आता कॅनडा आणि अमेरिकेसह युरोपातील अनेक देशांमध्ये 4 दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी या संकल्पनेची चाचणी सुरू होणार आहे. मात्र, भारतातील तज्ज्ञांना याबाबत अद्याप काही सकारात्मक दिसलेले नाही.

युरोप आणि अमेरिकेसाठी भारतीय बाजारपेठ अद्याप पुरेशी परिपक्व झालेली नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. या कारणास्तव त्याची अंमलबजावणी सर्वच क्षेत्रात होऊ शकत नाही.

भारतात कधी लागू होणार?

नवीन कामगार संहितेवर दीर्घकाळ काम सुरू आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचीही चर्चा आहे. मात्र, अनेक डेडलाईन उलटूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे समर्थन केले होते आणि ते म्हणाले होते की, वर्क फ्रॉम होम इकोसिस्टम, फ्लेक्सिबल वर्क प्लेसेज आणि फ्लेक्सिबल कामाचे तास या भविष्यातील गरजा आहेत.

नव्या लेबर कोडनुसार कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 3 दिवस साप्ताहिक सुट्टी देण्याची तरतूद आहे. मात्र उर्वरित 4 दिवस त्यांना 12-12 तास काम करावे लागणार आहे. भारतात त्याच्या अंमलबजावणीसाठी अद्याप कोणतीही अंतिम मुदत निश्चित केलेली नाही.

चार नवीन कोड

नवीन कामगार संहिता वेतन, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि व्यावसायिक सुरक्षितता यांच्याशी संबंधित आहेत. नवीन कामगार संहितेअंतर्गत व्यावसायिक सुरक्षा लागू करण्यासाठी कायदे करण्यात आले आहेत, असे भूपेंद्र यादव यांनी सांगितले. (4 days work a week, 3 days off survey, feedback is also fun)