‘या’ बँकेकडून मोफत अनलिमिटेड ATM व्यवहारांची सुविधा, हव्या तितक्या वेळा पैसे काढा, कोणतेही शुल्क नाही

| Updated on: Sep 08, 2021 | 11:45 AM

सध्या बँकेची कोणतीही सुविधा वापरायची ठरली की त्याचं बँकेला शुल्क द्यावं लागतंय. हे शुल्कही दिवसेंदिवस वाढत चालल्याने सर्वसामान्य बँक ग्राहकांवर याचा चांगलाच बोजा पडत आहे. सर्वसामान्यपणे आता बँकांनी 3 पेक्षा अधिकचे एटीएम व्यवहार केल्यास त्यावर शुल्क लावले जाते. ही मर्यादा मोठ्या शहरांसाठी (मेट्रो सिटी) 5 व्यवहारापर्यंत आहे आणि त्यानंतर शुल्कआकारणी होते. मात्र, एक अशीही बँक आहे जी आपल्या ग्राहकांना अमर्याद मोफत एटीएम व्यवहाराची सूट देतेये (ATM Unlimited Transaction).

1 / 5

2 / 5
या बँकेचं नाव आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (Ujjivan Small Finance Bank). या बँकेने वर्ल्‍ड सीनियर सिटीजन डेच्या दिवशी या सुविधेची घोषणा केली. यानुसार ग्राहक बँक ब्रँच आणि एटीएम दोन्हीमधून अनलिमिटेड मोफत व्यवहार करु शकतात. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

3 / 5
बँकेच्या या घोषणेनंतर ग्राहकांमध्ये चांगलंच आनंदाचं वातावरण आहे. बँकेने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिलीय. या ट्विटला रिप्लाय करत अनेक ग्राहकांनी बँकेच्या या निर्णयाचे स्वागत केलेय.

4 / 5
जूनमध्ये आरबीआयने एटीएममधून कॅश काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले होते. यानुसार आर्थिक व्यवहारांसाठी 15 रुपयांपासून 17 रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येतोय. इतर व्यवहारांसाठी 5 ते 6 रुपये प्रति व्यवहार शुल्क आकारण्यात येतोय. हे नियम 1 ऑगस्ट 2021 पासून लागू आहेत.

5 / 5
तुम्ही जर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला बँकेच्या कोणत्याही व्यवहारासाठी शुल्क लागणार नाही.