AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त एक कॉल करा आणि आधार कार्डाच्या समस्या चुटकीसरशी सोडवा

Aadhaar card | हा 1947 क्रमांक विनामूल्य आहे जो वर्षभर IVRS मोडवर चोवीस तास उपलब्ध असतो. तसेच या सुविधेसाठी कॉल सेंटरचे प्रतिनिधी सकाळी 7 ते रात्री 11 (सोमवार ते शनिवार) उपलब्ध आहेत. त्याचबरोबर रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रतिनिधी उपलब्ध असतात.

फक्त एक कॉल करा आणि आधार कार्डाच्या समस्या चुटकीसरशी सोडवा
आधारकार्ड
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 30, 2021 | 9:50 AM
Share

नवी दिल्ली: जर तुम्हाला आधार कार्डशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर आता फक्त एक नंबर डायल करून त्याचे निराकरण केले जाऊ शकते. आधार कार्डधारकांना आधारशी संबंधित अनेक समस्या आहेत, ज्यासाठी तुम्ही आता 1947 नंबर डायल करू शकता आणि तुमच्या सर्व समस्या दूर करू शकता. UIDAI ने ट्विट करून या क्रमांकाची माहिती दिली आहे. 12 प्रादेशिक भाषांमध्ये ही हेल्पलाईन उपलब्ध असेल.

आधार हेल्पलाइन 1947 हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, उडिया, बंगाली, आसामी आणि उर्दू या 12 भाषांमध्ये उपलब्ध असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. #Dial1947ForAadhaar वर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाषेत संवाद साधू शकता. हा क्रमांक भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) जारी केला आहे.

हा 1947 क्रमांक विनामूल्य आहे जो वर्षभर IVRS मोडवर चोवीस तास उपलब्ध असतो. तसेच या सुविधेसाठी कॉल सेंटरचे प्रतिनिधी सकाळी 7 ते रात्री 11 (सोमवार ते शनिवार) उपलब्ध आहेत. त्याचबरोबर रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रतिनिधी उपलब्ध असतात.

PVC आधार कसे तयार कराल?

1. नवीन आधार PVC कार्डसाठी, तुम्हाला UIDAI वेबसाइटला भेट द्यावी लागेल. 2. ‘माय आधार’ विभागात जा आणि ‘ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड’ वर क्लिक करा. 3. यानंतर, तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी आधार नोंदणी आयडी (EID) टाकावा लागेल. 4. आता तुम्ही सिक्युरिटी कोड किंवा कॅप्चा भरा आणि OTP साठी Send OTP वर क्लिक करा. 5. यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला OTP टाका. 6. आता तुमच्याकडे आधार पीव्हीसी कार्डचा Preview दाखवला जाईल. 7. यानंतर तुम्ही खाली दिलेल्या पेमेंट पर्यायावर क्लिक करा. 8. यानंतर तुम्ही पेमेंट पेजवर जाल, येथे तुम्हाला 50 रुपये शुल्क जमा करावे लागेल. 9. पेमेंट पूर्ण केल्यानंतर, तुमच्या आधार PVC कार्डची ऑर्डर प्रक्रिया पूर्ण होईल.

संबंधित बातम्या:

Masked Aadhar Card | मास्क्ड आधार कार्ड म्हणजे काय? किती आहे सुरक्षित आणि कुठे होतो वापर?

तुमचं आधार कार्ड बनावट आहे का? एका मिनिटात तपासून पाहा

व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आधार कार्ड, पॅनकार्ड, व्होटिंग कार्ड रद्द कसे होते, जाणून घ्या सर्वकाही

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?