Alert | या पाहुण्यापासून सावधान, चोरपावलाने येतो नी खाते साफ करून जातो..

| Updated on: Sep 23, 2022 | 4:29 PM

Alert | जग खेडे झाल्यापासून फसवणुकीचे इतके प्रकार वाढले आहेत की सांगता सोय नाही. आता हा नवीन पाहुणाच बघा ना..

Alert | या पाहुण्यापासून सावधान, चोरपावलाने येतो नी खाते साफ करून जातो..
हा पाहुणा नकोच..
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय बँकांच्या (Indian Bank) खातेदारांवर सध्या संकट घोगांवत आहे. एक पाहुणा भेटीला आल्याने बँकाचेच नाही तर ग्राहकांचेही (Customers) धाबे दणाणले आहे. त्यामुळे बँकांनी त्यांच्या खातेदारांना या पाहुण्याची खातिरदारी न करण्याचा सल्ला दिला आहे. कोणत्याही आमिषाला बळी पडाल तर हा पाहुणा तुम्हाला गंडा घातल्याशिवाय राहणार नाही.

तर हा नवीन पाहुणा म्हणजे एक व्हायरस आहे. हा मेलवेअर ग्राहकांच्या रक्कमेवर हल्ला चढवतो. खाते साफ करुन निघून जातो. सायबर भामट्यांनी हा नवीन मेलवेअर विकसीत केला आहे. त्यामुळे तुमच्या बँकेची डिटेल्स मिळवून त्याद्वारे तुमचे खाते साफ करण्यात येते.

बँकेचे अॅप्स डाऊनलोड करायचे असेल तर इतर कोणत्याही लिंकवरुन डाऊनलोड करु नका. अपडेट करु नका, असे आवाहन बँकांनी केले आहे. गूगल प्ले स्टोअरमधील अधिकृत अॅप्सच डाऊनलोड करण्याची सूचना बँकांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

इंडियन कम्प्युटर इमरजन्सी रेस्पॉन्स टीम (CERT-in) या संस्थेने याविषयीचा अलर्ट दिला आहे. त्यानुसार, नकली एंड्रॉईड अप्लिकेशन सोबत या चोरट्या पावलाने तुमच्या मोबाईल, लॅपटॉपमध्ये प्रवेश करतो. तिथून त्याचा कार्यभाग साधून घेतो.

क्रोम, अमेझॉन, एनएफटी यासारख्या लोकप्रिय अॅपच्या माध्यमातूनही लपूनछपून हा व्हायरस येतो. त्यामुळे ग्राहकांना धोका मिळतो. यापासून वाचण्यासाठी युझर्सनी केवळ अधिकृत अॅप स्टोअरमधूनच ते डाऊनलोड करावे. अपडेट करावे.

हा मेलवेअर एक एकदा फोनमध्ये आला की हटण्याचे नाव घेत नाही. जेव्हा युझर्स नेट बँकिंग अॅपच्या मार्फत लॉग-इन करतो. तेव्हा हा मेलवेअर युझरचा हा डाटा चोरतो. हा मेलवेअर बँकिंग आणि क्रिप्टो वॅलेटसहित 200 हून अधिक मोबाईल अप्लिकेशनला लक्ष्य करतो.

एचडीएफसी, आयडीबीआय, करुर वैश्य सहित इतर बँकांनी ग्राहकांना या मेलवेअरपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ई-मेल, एसएमएस यामाध्यमातून हा मेलवेअर हळूच तुमच्या मोबाईलमध्ये प्रवेश करतो. कोणत्याही गिफ्ट, ऑनलाईन लॉटरी वा इतर आमिषे दाखविणारे एसएमएस, ई-मेलद्वारे आलेल्या लिंकवर क्लिक करु नका. .