fixed deposit schemes | दर महिन्याला सर्वोत्तम परतावा देणा-या 5 मुदत ठेव योजना

| Updated on: Mar 21, 2022 | 10:48 AM

दर महिन्याला सर्वाधिक परतावा देणा-या एफडी योजनेचा विचार करता, एसबीआय एन्युटी डिपॉझिट फिक्स्ड  खात्यात ग्राहकाला 5.40 टक्के व्याज दराने परतावा मिळत आहे. तर एचडीएफसी मंथली इन्कम फिक्स्ड डिपॉझिट योजनेत 5.50 टक्के व्याज मिळते. 

fixed deposit schemes | दर महिन्याला सर्वोत्तम परतावा देणा-या 5 मुदत ठेव योजना
Fix deposit
Follow us on

मुबंई :  मुदत ठेव योजना (FD Sheme) ही एक वर्षे अथवा पाच अथवा त्यापुढील वर्षांसाठी केली जाते, हा लोकांचा समज पक्का आहे. पण महिन्यालाच मुदत ठेव योजनेतून चांगला परतावा मिळाला तर ?  म्हणजे नोकरदारांना जसा दर महिन्याला पगार मिळतो. तसे दर महिन्याला काही ठराविक रक्कमेचे उत्पन्न मिळाले तर. मुदत ठेव योजनेत रक्कम गुंतवणूक करणा-यांना ही गोष्ट चांगली माहिती आहे. दर महिन्याला चांगला परतावा मिळतो का, असा सवाल आहे, कारण अनेकांना त्याविषयी साशंकता आहे. चांगला परतावा (Return) मिळत असेल तर त्यापेक्षा घरच्या बजेटसाठी कोण आधार देईल. असे उत्पन्न मिळत असेल तर तेवढाच घर खर्चाला हातभार लागेल. महिनावारी मुदत ठेव योजनेत (Monthly Fixed Deposit) बचत खात्यापेक्षा अधिकचे व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनेत अधिकत्तम व्याज मिळते. 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत महिनावारी मुदत ठेव योजना सुरु करता येते. या योजनेत एकदा एकरक्कमी पैसे गुंतवले की तुम्ही निश्चित केलेल्या कालावधीसाठी रक्कम बँकेकडे तारण राहते आणि कालावधी पूर्ण होताच मुळ रक्कम परत मिळते.

सर्वसामान्य गुंतणुकदारांना मुदत ठेव योजनेत गुंतवणुकीसाठी किती कालावधी निवडायचा याचा अधिकार ग्राहकांना आहे. मासिक, तिमाही, सहामाही अथवा वर्षभरासाठी मुदत ठेव योजना उपलब्ध आहेत. कालावधी पूर्ण झाल्यानंतर तीच रक्कम मुदत ठेव योजनेत पुन्हा गुंतविता येते. दर महिन्यासाठीच्या मुदत ठेव योजनेत व्याज दर हा गुंतवणुकीचा कालावधी, जमा असलेली रक्कम, त्यासाठीचा निर्धारीत व्याजदर यावर आधारीत असतो. मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करताना ग्राहकाला बँक याविषयीची इत्यंभूत माहिती देते.

महिनावारी सर्वोत्तम परतावा देणा-या 5 मुदत ठेव योजना

महिनावारी सर्वोत्तम परतावा देणा-या 5 मुदत ठेव योजनांमध्ये एसबीआय एन्युटी मुदत ठेव योजनेत सध्या 5.40 टक्के व्याज मिळत आहे. एचडीएफसी मंथली इन्कम फिक्स्ड डिपॉझिट योजनेत 5.50 टक्के व्याज मिळत आहे. तर आयसीआयसीआय मंथली इनकम फिक्स्ड डिपॉझिट योजनेत 5.35 टक्के परतावा मिळत आहे. अॅक्सिस मंथली इनकम फिक्स्ड डिपॉझिट योजनेत सध्या 5.75 टक्के व्याज मिळत आहे. तर युनियन बँकेच्या महिनावारी मुदत ठेव योजनेत सद्या 5.60 टक्के व्याजदर सुरु आहे, त्यानुसार जमा रक्कमेवर परतावा मिळेल. आता ग्राहकांना यापैकी कोणत्याही एका बँकेत महिनावारी परतावा देणा-या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करता येऊ शकते.

महिनावरी परतावा देणा-या मुदत ठेव योजना 7 दिवस ते 10 वर्षांकरीता गुंतवणूक करता येते. या खात्यात कमीत कमी किती रक्कम जमा करायची हे बँक ठरवते. प्रत्येक बँके त्यांच्या धोरणानुसार ही रक्कम ठरवते. तरीही सर्वसामान्यपणे कमीतकमी 10 हजार रुपयांची ही रक्कम असू शकते. एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, सर्वसामान्य मुदत ठेव योजनांपेक्षा महिनावारी मुदत ठेव योजनेत परतावा कमी मिळतो. कारण दरमहिन्याला ग्राहकाला रक्कम परत करायची असते. परिणामी त्यावरील व्याज ही कमी देण्यात येते.

इतर बातम्या

Aurangabad जिल्हा परिषदेवर आजपासून प्रशासक राज, सदस्यांचा निरोपसमारंभ, निवडणूका कधी?

Pune Zoo| पुण्यात कात्रजची बाग फुलली ; प्राणी संग्रहालयाला 12 हजार पर्यटकांनी दिली भेट

राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह