इंधन दरवाढीचा फटका! वाहतूक खर्च वाढल्याने फळांच्या किमती गगनाला भिडल्या

| Updated on: Apr 28, 2022 | 8:36 AM

इंधनाचे दर वाढल्याने वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वच अन्नधान्य आणि फळे-भाजीपाला यांच्या दरात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. विशेष: ग्रामीण भागात वाहतूक खर्च वाढल्याने फळाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

इंधन दरवाढीचा फटका! वाहतूक खर्च वाढल्याने फळांच्या किमती गगनाला भिडल्या
Follow us on

मुंबई : गेल्या सहा एप्रिलपासून इंधनाचे (fuel) दर स्थिर आहेत, त्याममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (diesel) दरात प्रति लिटर मागे तब्बल दहा रुपयांपेक्षाही अधिक वाढ झाली आहे. इंधनाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यास त्याचा फटका हा केवळ वाहनचालकांनाच बसत नाही, तर तो जनतेला देखील अप्रत्यक्षपणे महागाईच्या रुपात बसत असतो, इंधनाचे दर वाढल्याने वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वच अन्नधान्य आणि फळे-भाजीपाला यांच्या दरात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. विशेष: ग्रामीण भागात वाहतूक खर्च वाढल्याने फळाच्या किमती गगनाला भिडल्या आहे. सर्वच प्रकारच्या फळांचे दर दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढले आहेत. लिंबाच्या भावात मोठी वाढ झाली असून, लिंबाचा दर हजार रुपये शेकडा झाला आहे.

उन्हामुळे ज्यूसच्या मागणीत वाढ

सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे, उन्हाच्या कडाक्यामध्ये शहरी भाग असो अथवा ग्रामीण भाग ग्रहाक थंडगार लिंबू आणि उसाचा रस पिण्यास प्राधान्य देतात. तसेच या काळात विविध फळाच्या ज्यूसला देखील मोठी मागणी असते. मात्र यंदा पेट्रोल- डिझेलचे दर गगनाला भिडल्याने वाहतूक खर्च वाढला. वाहतूक खर्च वाढल्याने फळांच्या दरात देखील वाढ झाली आहे. फळांची किंमत वाढल्याने ऊस, लिंबाचा रस तसेच विविध फळांच्या ज्यूसमध्ये दीड पटीने वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. एकीकडे उन्हाचा कडाका वाढत आहे, तर दुसरीकडे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. फळांच्या किमती वाढल्याने आता फळ खरेदी करणे देखील सर्वसामांन्याच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

व्यवसायातील मार्जीन कमी झाले

पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. अनेक फळांची आवक ही परराज्यातून होते. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने वाहतूक खर्च देखील वाढला आहे. त्यामुळे फळांच्या किमतीत वाढ झाली आहे. दुसरीकडे महागाई देखील वाढली आहे. त्यामुळे आता पूर्वीच्या किमतीत फळे मिळत नाहीत. त्यामुळे आम्हाला देखील ग्राहकांना वाढीव दराने फळे विकावी लागत आहेत. महागाई वाढल्याने व्यवसायातील मार्जीन देखील कमी झाल्याची प्रतिक्रिया फळे विक्रेत्यांनी दिली.