
दररोज कामावर जाण्यासाठी किंवा बाहेर फिरायला जाण्यासाठी सर्वात आरामदायी आणि सुरक्षित प्रवास म्हणजे रेल्वे प्रवास. आज लाखो लोकं ट्रेनने प्रवास करत असतो, म्हणूनच सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने Rail One हे अॅप लाँच केलं आहे. तर Rail One या ॲपद्वारे ट्रेन तिकिट बुकिंगवर सवलत देत आहे. ही ऑफर 14 जानेवारी 2026 पासून सुरू झाली आहे. जर तुम्ही या अॅपद्वारे अनरिजर्व्ड जनरल तिकीट बुक करून डिजिटल पेमेंट जसे की यूपीआय, कार्ड, अॅप वॉलेट द्वारे पेमेंट केले तर तुम्हाला 3% सूट मिळेल.
ऑफर सुरू झाली आहे, पण प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न आहे की ही ऑफर किती दिवसांसाठी वैध आहे? Northern Railway ने X वर केवळ ऑफरच नाही तर ही ऑफर 14 जानेवारी ते 14 जुलै 2026 पर्यंत सक्रिय राहील हे पोस्टद्वारे सांगितले आहे. याचा अर्थ तुम्ही सहा महिन्यांसाठी या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
स्मार्ट यात्रियों की स्मार्ट ऐप!#RailOne App पर अनारक्षित टिकट बुक करते समय डिजिटल भुगतान करें और 3% तक की छूट पाएं। स्मार्ट विकल्प चुनें, बिना किसी टेंशन सफ़र का आनंद लें। pic.twitter.com/fyR69xeuuj
— Northern Railway (@RailwayNorthern) January 12, 2026
रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की 3% सवलत फक्त रेल वन अॅपद्वारे केलेल्या बुकिंगसाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही इतर कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंवा वेबसाइटद्वारे सामान्य तिकीट बुक केले तर तुम्हाला सवलत मिळणार नाही. तर या मागचा रेल्वे सरकारचा उद्देश म्हणजे या ऑफर द्वारे स्टेशनच्या तिकीट काउंटरवरील गर्दी कमी करणे आहे.
हे अॅप CRIS (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम्स) ने विकसित केलेले आणि IRCTC सोबत एकत्रित केलेले एक उत्तम अॅप आहे. हे अॅप तुम्हाला केवळ ट्रेन तिकिटे बुक करण्याची परवानगी देत नाही तर PNR स्टेटस, ट्रॅक युअर ट्रेन, ऑर्डर फूड, रेल मदत, फाइल रिफंड आणि कोच पोझिशन यासारखी माहिती देखील प्रदान करते. हे अॅप अँड्रॉइड आणि अॅपल वापरकर्त्यांसाठी अधिकृत गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. तुम्ही ते फक्त अधिकृत स्टोअरवरून डाउनलोड करावे.