MIW vs UPW : गुजरातनंतर आता युपीचा नंबर, मुंबई सलग तिसऱ्या विजयासाठी सज्ज, सामना किती वाजता?
Mumbai Indians Women vs UP Warriorz Women Match Preview : मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स या दोन्ही संघांचा हा चौथ्या मोसमातील चौथा सामना असणार आहे. यूपीसमोर या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान असणार आहे.

वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमातील आठव्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स आमेनसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील एकूण चौथा सामना असणार आहे. मुंबईने मोसमात पराभवाने सुरुवात झाल्यानंतर जोरदार कमबॅक केलं. मुंबईने आरसीबीकडून पराभूत झाल्यानंतर जोरदार मुसंडी मारली. भारताने दिल्ली कॅपिट्ल्सचा धुव्वा उडवला. त्यानंतर सलग 2 सामने जिंकणाऱ्या गुजरात जायंट्सचा विजयरथ रोखला. त्यामुळे मुंबईला यूपीवर मात करत या मोसमात एकूण सलग आणि तिसरा विजय मिळवण्याची संधी आहे.
यूपीसमोर सलग चौथा पराभव टाळण्याचं आव्हान, मुंबईला रोखणार?
दुसऱ्या बाजूला युपीला या मोसमात आतापर्यंत विजयी होता आलेलं नाही. यूपीचा या मोसमातील तिन्ही सामन्यांत पराभव झाला आहे. त्यामुळे यूपीसमोर मुंबई विरुद्ध विजय मिळवून सलग चौथा पराभव टाळण्याचं आव्हान असणार आहे. मात्र युपीसाठी मुंबई विरुद्ध विजय मिळवणं सोपं नसणार, हे स्पष्ट आहे. मुंबईने सलग 2 सामने जिंकले असल्याने विश्वास दुणावलेला आहे. मुंबई विरुद्ध युपी यांच्यातील सामना कधी आणि कुठे पाहता येईल हे सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स सामना कधी?
मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स सामना गुरुवारी 15 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स सामना कुठे?
मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.