U19 World Cup 2026 : टीम इंडिया पहिल्या विजयासाठी सज्ज, यूएसएचं आव्हान, सामना किती वाजता?
United States of America U19 vs India U19 : अंडर 19 टीम इंडियाने नुकतंच वैभव सूर्यवंशी याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. त्यानंतर आता टीम इंडिया आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. भारतासमोर पहिल्या सामन्यात यूएसएचं आव्हान आहे.

आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कपनंतर आणि मेन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी आता अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. अंडर 19 वनडे वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 15 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ भिडणार आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना हा 15 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. तर 6 फेब्रुवारीला अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. अशाप्रकारे या स्पर्धेत 41 एकदिवसीय सामन्यानंनतर वर्ल्ड कप जिंकणारा संघ कोणता असणार? हे स्पष्ट होईल. या स्पर्धेतील पहिल्या दिवशी अर्थात 15 जानेवारीला एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध यूएसए आमनेसामने असणार आहेत. हा सामना कुठे आणि कधी पाहता येईल? हे जाणून घेऊयात.
भारताची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, आरएस अंबरीश, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), उधव मोहन, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन आणि खिलान पटेल.