Vivo X200T भारतात लवकरच होणार लाँच, फ्लिपकार्टवर दिसला पॉवरफुल कॅमेरा फोन
Vivo X200T लवकरच भारतात लाँच होणार आहे. त्याची मायक्रोसाईट फ्लिपकार्टवर लाइव्ह आहे. या फोनमध्ये Zeiss ट्रिपल कॅमेरा आणि मोठी बॅटरी असेल. चला तर मग या फोनची किंमत आणि फिचर्स याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊयात.

विवोने भारतात त्यांचा नवीन प्रीमियम स्मार्टफोन, विवो X200T लवकर लाँच होणार आहे. तर यावेळी कंपनीने अधिकृत घोषणा केली असून फ्लिपकार्टवरील एक खास पेजवरून आता हा फोन लवकरच देशात येणार असल्याची पुष्टी झाली आहे. कंपनीने या फोनच्या प्रभावी झीस कॅमेरा डिझाइनची देखील माहिती दिली आहे. त्याचबरोबर अहवालांनुसार त्याची किंमत 50 हजार रूपये ते 55 हजार रूपये दरम्यान असू शकते. कॅमेरा आणि बॅटरी लाइफच्या बाबतीत हा फोन हाय-एंड सेगमेंटमध्ये स्पर्धा करेल. चला तर मग आजच्या लेखात या फोनची अधिक माहिती जाणून घेऊयात…
फ्लिपकार्टवर दिसला Vivo X200T
Vivo X200T ची मायक्रोसाईट फ्लिपकार्टवर लाईव्ह झाली आहे, ज्यात विवो एक्स200टी हा फोन भारतात लाँचची पुष्टी केली आहे. हा प्लॅटफॉर्म फोनच्या विक्रीचा प्राथमिक स्रोत असेल. Vivo ने त्याच्या मागील कॅमेरा मॉड्यूलची झलक देखील दिली आहे, जो गोलाकार दिसत आहे आणि त्यात ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनचा पर्पल रंगाचा व्हेरिएंट देखील टीझ करण्यात आला आहे, जो प्रीमियम लूक देतो. कंपनीने सांगितले आहे की येत्या काही दिवसांत अधिक तपशील उघड केले जातील.
किंमत आणि लाँच टाईमलाईन
लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, Vivo X200T ची किंमत भारतात 50 हजार रूपये ते 55 हजार रूपये इतकी असू शकते. या किंमतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर या रेंजमधील Samsung आणि iPhone 15 शी स्पर्धा करेल. तसेच हा फोन स्टेलर ब्लॅक आणि सीसाईड लिलाक रंगांमध्ये येण्याची अपेक्षा आहे.
तर हा Vivo स्मार्टफोन जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात लाँच करण्याची अपेक्षा आहे. अलीकडेच, हा फोन BIS सर्टिफिकेशन साइटवर मॉडेल क्रमांक V2561 सह दिसला, ज्यामुळे त्याचे भारतात लाँचिंग जवळजवळ निश्चित झाले आहे.
डिस्प्ले आणि प्रोसेसरची ताकद
Vivo X200T मध्ये 1.5K रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. हा फोन MediaTek Dimensity 9400+ चिपसेटद्वारे समर्थित असण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे तो एक उच्च-कार्यक्षमता स्मार्टफोन बनतो. हा Android 16 वर आधारित OriginOS 6 चालवेल असे देखील म्हटले जाते. याचा अर्थ वापरकर्त्यांना नवीनतम सॉफ्टवेअर आणि एक सहज अनुभव मिळेल.
कॅमेरा आणि बॅटरी पॉवर
Vivo X200T मध्ये Zeiss ब्रँडेड ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. यात OIS सह 50MP Sony LYT-702 प्रायमरी कॅमेरा, 50MP Samsung JN1 पेरिस्कोप कॅमेरा आणि 50MP LYT-600 अल्ट्रावाइड कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. फोनमध्ये 90W फास्ट चार्जिंग आणि 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट असलेली 6200mAh ची मोठी बॅटरी असण्याची अपेक्षा आहे. याचा अर्थ हा फोन दीर्घकाळ टिकणारा परफॉर्मन्स आणि फास्ट चार्जिंग दोन्ही देईल.
