रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करणे आता आणखी झाले सोपे ; ‘रेडरेल’ अ‍ॅप लॉन्च, कसे वापरायचे अ‍ॅप जाणून घ्या.. सविस्तर माहिती

रेडबस RedBus ने RedRail अ‍ॅप लाँच केले आहे. आता तुम्हाला ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी आणखी एक नवीन अ‍ॅप मिळेल. मेक माय ट्रिप ग्रुप कंपनी रेडबसने मंगळवारी रेडरेल अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने ग्राहकांना ट्रेनचे तिकीट बुक करणे सहज सोपे होणार आहे. कंपनीला अपेक्षा आहे की हे नवीन अ‍ॅप पुढील 3 ते 4 वर्षांत त्यांच्या एकूण तिकीट बुकिंग मूल्यावर 10 ते 15 टक्के नफा मिळवून देईल.

रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करणे आता आणखी झाले सोपे ; ‘रेडरेल’ अ‍ॅप लॉन्च, कसे वापरायचे अ‍ॅप जाणून घ्या.. सविस्तर माहिती
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 13, 2022 | 6:15 PM

सध्या लोक ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंगसाठी (ticket booking) डायरेक्ट आयआरसीटीसीची वेबसाइट वापरतात. रेडबसचे सीईओ प्रकाश संगम यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, भविष्यात हे क्षेत्र अधिक विस्तारीत होणार असल्याने, आम्ही ‘स्टँड अलोन रेड रेल अ‍ॅप’ लॉन्च केले गेले आहे. पुढील काळात या व्यवसायात अनेक संधी (Many opportunities) निर्माण होणार आहेत. सध्या, बस आणि ट्रेन या दोन्ही विभागांमध्ये तिकिट बुकिंगसाठी डिजिटल माध्यमांचा अधिक वापर केला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग सातत्याने वाढत (Constantly growing) आहे. ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग मार्केटमध्ये, ही एक मोठी संधी असून, यामाध्यमातून देशभरात दररोज सुमारे दहा लाख व्यवहार होतात.

काय आहे कंपनीचे नियोजन ?

कोरोनाच्या काळात तिकीट बुकिंगसाठी लोक डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. बस आणि ट्रेनच्या प्रवाशांच्या ‘ओव्हरलॅप’ चाही कंपनीला फायदा होईल. बसने प्रवास करणारे सुमारे 65 टक्के प्रवासी ट्रेन आणि ट्रेन पॅसेंजर बस चा देखील वापर करतात आणि कंपनी या वापरकर्त्याचा आधार ‘रेडरेल’ला पुढे आणण्यासाठी वापरू शकते . बिझनेस टेक्नॉलॉजी ही कंपनी बस तिकीट बुकिंग विभागात प्रदीर्घ काळापासून उपस्थित असल्याने, त्यांच्याकडे बस प्रवाशांचा मोठा वापरकर्ता वर्ग आहे जे ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी रेडरेलकडे आकर्षित होऊ शकतात. प्रकाश म्हणाले, “आमच्या बस तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मने इंटरसिटी बस सेगमेंटमध्ये आधीच लक्षणीय वाढ केली आहे आणि आता आम्ही ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंग श्रेणीमध्ये स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. कंपनीच्या एकूण तिकीट बुकिंग मूल्यापैकी हा विभाग 10-15 % इतका असेल अशी आमची अपेक्षा आहे. त्यांनी सांगितले की रेड बस 5 ते 6 स्थानिक भाषांमध्ये देखील अ‍ॅप लाँच करण्याचा विचार करत आहे.’’

‘रेडरेल’ वापरणे आहे खूप सोपे

प्रथम तुम्हाला अ‍ॅप उघडावे लागेल आणि बुक ट्रेन तिकीट पर्यायावर क्लिक करावे लागेल.
आता तुम्हाला तुमच्या प्रवासासाठी सध्याची ट्रेन शोधावी लागेल.
येथे तुम्हाला ट्रेन आणि क्लास निवडावा लागेल.
यानंतर तुम्हाला IRCTC युजरनेम टाकावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला पेमेंटची पद्धत निवडावी लागेल आणि पेमेंट करावे लागेल.
शेवटी तुम्हाला IRCTC पासवर्ड टाकून बुकींक करता येईल.

Chandrakant Patil: राज ठाकरेंच्या आधीपासून आम्ही हिंदुत्वाचे मुद्दे मांडतोय; चंद्रकांत पाटलांच्या टोल्याचा नेमका अर्थ काय?

Cm Uddhav Thackeray मंत्रालयात येताच मुख्यमंत्र्यांचा कामाचा धडाका, कोस्टल रोडचाही घेतला आढावा

राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेला आमचा विरोध; पवार हे जातीवादी नाहीत : आठवले