Aadhaar Card Linking : केंद्र सरकारचा मोठा दिलासा! आधार कार्डधारकांना लिकिंगसाठी मुदत वाढवली

| Updated on: Mar 22, 2023 | 6:34 PM

Aadhaar Card Linking : केंद्र सरकारने आधार कार्ड धारकांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावरच ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार आधार कार्डधारकांना लिकिंगसाठीची मुदत वाढवून देण्यात आली आहे. एक वर्षाची मुदत वाढ देण्यात आल्याने आधार कार्डधारकांचा जीव भांड्यात पडला आहे.

Aadhaar Card Linking : केंद्र सरकारचा मोठा दिलासा! आधार कार्डधारकांना लिकिंगसाठी मुदत वाढवली
Follow us on

नवी दिल्ली : आधार कार्डचा (Aadhaar Card) वापर आता प्रत्येक ठिकाणी होतो. प्रत्येक नागरिकाकडे हे महत्वपूर्ण ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्याआधारे अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करता येतात. बँक खाते उघडण्यासाठी, शाळेत प्रवेश घेताना, सिमकार्ड खरेदीसाठी, पासपोर्ट तयार करण्यासाठी, गॅस सिलेंडरची सबसिडी मिळवण्यासाठी, जवळपास अनेक कामात आधार कार्डची गरज पडते. केंद्र सरकारने आधार कार्ड धारकांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावरच ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार आधार कार्डधारकांना लिकिंगसाठीची (Aadhaar Card Linking) मुदत वाढवून देण्यात (Extend Last Date) आली आहे. एक वर्षाची मुदत वाढ देण्यात आल्याने आधार कार्डधारकांचा जीव भांड्यात पडला आहे.

आधार कार्डधारकांसाठी ही आनंदवार्ता आली आहे. त्यानुसार, आधार कार्ड (Aadhaar Card) आणि निवडणूक ओळखपत्र जोडणीची (Voter ID) अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. 1 एप्रिल 2023 पूर्वी आधार सोबत वोटर आयडी जोडण्याची मुदत देण्यात आली होती. पण अनेक नागरिकांनी ही मुदत वाढविण्याची विनंती केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला. आता आधारसोबत निवडणूक ओळखपत्र जोडणी करण्यासाठी 31 मार्च 2024 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

केंद्राने काढली अधिसूचना

हे सुद्धा वाचा

बिझनेस टुडेने याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, कायदा आणि न्याय मंत्रालयाने (Ministry of law and justice) याविषयी एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. वास्तविक केंद्र सरकारने आधार कार्ड आणि निवडणूक ओळखपत्र जोडण्याचे काम स्वैच्छिक असल्याचा दावा केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानुसार, या निर्णयामुळे एकापेक्षा अधिक मतदार संघात एखाद्या मतदाराचे नाव नोंदणी झाले असेल आणि तो दोन्ही ठिकाणी त्याचा वापर करत असेल तर ही बाब समोर येईल आणि त्याचे एक मतदार ओळखपत्र रद्द करण्यात येईल. आधार कार्ड नोंदणीची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. ऑनलाईन पद्धतीने कोणीही ही प्रक्रिया पूर्ण करु शकतो.

असे करा लिकिंग

  1. आधार – मतदान ओळखपत्र लिंक करण्यासाठी https://www.nvsp.in/ येथे लॉग इन करा.
  2. आता होम पेजवरील Search in Electoral Roll वर क्लिक करा.
  3. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. याठिकाणी आवश्यक सर्व माहिती भरा.
  4. मतदान ओळखपत्र, खासगी माहिती, EPIC क्रमांक आणि इतर माहिती भरुन सर्च करा.
  5. नंतर Feed Aadhaar No च्या पर्यायावर क्लिक करा.
  6. एक पॉप-विंडो उघडेल. त्यात तुमच्या आधार कार्डची माहिती जमा करा.
  7. तुमच्या माहितीचा पडताळा करा. मोबाईल क्रमांक आणि ई-मेलवर ओटीपी येईल.
  8. ओटीपी टाकून सबमिटवर क्लिक करा.
  9. त्यानंतर तुम्हाला मॅसेज येईल. त्यात आधारशी मतदान ओळखपत्र जोडल्याचे माहिती असेल.