Customer Care: तुम्हीदेखील कस्टमर केअरचा नंबर गुगलवर सर्च करता? अशा प्रकारे अडकू शकता जाळ्यत

असे बरेच लोकं आहेत जे थेट गुगलवर जाऊन कोणाचा तरी नंबर शोधतात. समजा तुम्हाला बँकेचा दादर शाखेचा क्रमांक हवा असेल, तर तुम्ही प्रथम Google वर काय टाइप कराल?

Customer Care: तुम्हीदेखील कस्टमर केअरचा नंबर गुगलवर सर्च करता? अशा प्रकारे अडकू शकता जाळ्यत
ऑनलाईन स्कॅम
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 17, 2023 | 2:54 PM

मुंबई, बँकच्या कस्टमर केअरचा क्रमांक (Customer Care Number) पाहिजे आहे? कुठे मिळेल? असा प्रश्न जर तुम्ही एखाद्याला विचारला तर तो हमखास अरे भाऊ, गुगल कर ना…’ अशा प्रकारचे उत्तर देईल. जेव्हा आपण फक्त बँकेबद्दलच नाही ईतर कोणत्याही संबंधात विचारले तर पहिले उत्तर गुगलवर शोधणे असते. गुगल किंवा इंटरनेटमुळे आपले जीवन अनेक प्रकारे सोपे झाले आहे, परंतु त्यांच्यासोबत काही धोकेही निर्माण झाले आहेत. सायबर फसवणुकीची प्रकरणे समोर येत आहेत. गुगल किंवा इंटरनेटने ज्या गोष्टी सोप्या केल्या, त्याच पद्धतीने घोटाळे (Farud) करणाऱ्यांसाठीसुध्दा गोष्टी सोप्या झाल्या आहेत. असाच एक प्रकार मुंबईत समोर आला, त्यात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.

 

काय आहे प्रकरण?

 

एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. महिलेने घरातील सामान शिफ्ट करण्यासाठी पॅकर आणि मूवर्सना बोलावले होते. पिडीतेने सांगितले की, तिच्या फोननंतर चार लोकं घरी पोहोचले, त्यापैकी एकाने तिच्याकडून 2500 रुपये घेतले आणि टीव्ही उचलून निघून गेला. त्यांनी सांगितले की त्यांनी सामान हलवण्यास सुरुवात केली, परंतु बराच वेळ झाला तरी जेव्हा कोणीही परत आले नाही तेव्हा महिलेच्या लक्षात आले.

पीडितेने या प्रकरणाची माहिती भोईवाडा पोलिसांना दिली, त्यांनी एका व्यक्तीला अटक केली. ही घटना किरकोळ गुन्ह्यासारखी वाटत असली तरी यापेक्षा मोठी फसवणूक होऊ शकते. महिलेने सांगितले की, तिला एका वेबसाइटवरून मूव्हर्स आणि पॅकर्सचा नंबर मिळाला.

 

लोकांना बनावट क्रमांक कसे मिळतात?

 

असे बरेच लोकं आहेत जे थेट गुगलवर जाऊन कोणाचा तरी नंबर शोधतात. समजा तुम्हाला बँकेचा दादर शाखेचा क्रमांक हवा असेल, तर तुम्ही प्रथम Google वर काय टाइप कराल? बहुतेक लोक बँकेचे नाव आणि पत्ता टाइप करून कस्टमर केअर नंबर शोधतील. या प्रकरणात, तुम्हाला प्रथम Google Map सह निकाल दिसेल.

हे फक्त बँकेतच नाही तर इतर कोणत्याही सेवेसह होऊ शकते. गुगल मॅप्ससह दिसणार्‍या पर्यायावर क्लिक करताच, नकाशासह तपशीलवार पृष्ठ तुमच्या समोर येईल. येथेच घोटाळेबाज अनेक वेळा खेळतात. येथे तुम्हाला नंबर आणि इतर तपशील दिसतील, तर सजेस्ट अॅन एडिटचा पर्यायही उपलब्ध असेल.

त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला नाव बदला किंवा इतर तपशील या दोन पर्यायांसह बंद करा किंवा काढा असा पर्याय मिळेल. पहिल्या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुम्हाला नाव तसेच नंबर, वेबसाइट आणि इतर तपशील बदलण्याचा पर्याय मिळेल. स्कॅमर येथून कोणताही डेटा काढू शकतात. किंवा तुम्ही बनावट तपशील तयार करू शकता.

यामुळे, जेव्हा कोणी ऑनलाइन नंबर शोधून कॉल करतो तेव्हा त्याचा कॉल स्कॅमरकडे जातो. त्याच्या मदतीने घोटाळेबाज लोकांची फसवणूक करण्याचे काम करतात. आता हे सर्व कसे टाळता येईल हा प्रश्न आहे.

 

कशा प्रकारे शोधाल कस्टमर केअरचा नंबर ?

 

तुम्ही ज्यांचा नंबर शोधत आहात त्यांचा नंबर अधिकृत वेबसाइटवरून काढा. अगदी बँकेच्या अॅप्सवरही तुम्हाला असे तपशील सहज मिळतील. दुसरीकडे, जर तुम्ही इतर कोणत्याही सेवेसाठी नंबर शोधत असाल, तर केवळ प्रामाणिक सेवा प्रदात्याशी संपर्क साधा.

गरज भासल्यास, त्यांच्या प्रत्यक्ष कार्यालयालाही जाऊन भेटा. ऑनलाइन जागेवरच घोटाळेबाज फसवणूक करत बसले आहेत. त्यामुळे, एकदा तुम्ही ऑफलाइन मार्केटमध्ये जाऊन सेवा प्रदात्याशी संपर्क साधला की, तुम्ही कोणत्याही फसवणुकीपासून स्वतःला वाचवू शकता.