EPF News : 40 व्या वर्षी नोकरी सोडली, 58 व्या वयापर्यंत खात्यात येईल व्याज ? नवा नियम काय?
PF Interest: ईपीएफओ (EPFO ) च्या नियमांनुसार योग्य अटी आणि शर्थीची पूर्तता केल्यास, तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी नोकरी सोडली तरी, तुमच्या पीएफ खात्यात जमा असलेल्या रकमेवर वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत व्याज मिळवणे सुरू ठेवू शकता.

Employee Provident Fund : पीएफ संदर्भात नवीन नियम आले आहेत. अनेकदा लोक नोकरी सोडल्यानंतर किंवा करीयरमध्ये ब्रेक घेतल्यानंतर पीए खात्या संदर्भात त्रस्त असतात. खास करुन ते लोक जे ४० वा ४५ मध्ये नोकरी सोडतात. त्यांना वाटते की निवृत्तीपर्यंत त्यांचा प्रोव्हीडंट फंड (PF)खात्यावर व्याज मिळणे बंद होऊन जाईल. कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO)नियमांतर्गत नोकरी सोडल्यानंतरही पीएफ खात्यातील जमलेल्या रकमेवर व्याज मिळते. मात्र, यासाठी काही अटी आणि शर्थी लावण्यात आलेल्या आहेत.
जर तुम्ही ४० – ४५ या वयात नोकरी सोडली असेल तरी तुमचे पीएफ खाते लागलीच बंद होत नाही. उलट तुमच्या पीएफ खात्यातील जमा रकमेवर ५८ सालापर्यंत व्याज मिळत राहू शकते. म्हणजे नोकरी सोडल्यानंतर देखील तुमचा पीएफ फंड वाढत राहिल. मात्र, तुम्हाला पीएफ खात्यांसंदर्भातील नियम माहिती असायला हवेत.
५८ वर्षानंतर पीएफ वर व्याज मिळणार नाही ?
जर तुमचे वय ५८ वर्षांचं असेल तर हे वय निवृत्तीचे मानले जाते. या वयानंतर देखील तुम्ही तुमच्या पीएफ खात्यात पैसे ठेवले असेल तर तुम्हाला त्या जमा रकमेवर कोणतेही नवीन व्याज मिळत नाही. अशात ५८ वर्षाच्या वयानंतर तुमच्या पीएफ खात्यावर व्याज मिळणे बंद होऊन जाईल.
नोकरी सोडल्यानंतर पीएफ काढण्याचे नियम काय ?
जर तुम्ही नोकरी सोडली असेल तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार पीएफ रक्कमेचा वापर करु शकता. बेरोजगारीच्या वेळी तुम्ही पीएफ खात्यातून एक निश्चित भाग काढू शकतात आणि उर्वरित रक्कम आपल्या मर्जीनुसार नंतर काढू शकता. जर तुम्ही सरकारी नोकरी जॉईंट केली असेल तर जुन्या पीएफ खात्याला नव्या पीएफ खात्यात कनवर्ट करु शकता.
केव्हा PF खाते इनएक्टिव्ह होऊ शकते का ?
जर तुमची नोकरी सुटल्यानंतर पीएफ खाते दीर्घकालापासून कोणतीही गुंतवणूक केली नाही तर तुमचे खाते निष्क्रीय होऊ शकते. नवीन नोकरी मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या जुन्या पीएफ खात्याला नव्या खात्यात ट्रान्सफर करु शकता. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.