EPFO Alert: तुमच्या पीएफ अकाऊंटसाठी घरबसल्या नॉमिनेशन फाईल करा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

| Updated on: Sep 29, 2021 | 3:05 PM

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नोकरदारांसाठी अनेक सुविधा सुरु केल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे ई नॉमिनेशन. EPFO Alert

EPFO Alert: तुमच्या पीएफ अकाऊंटसाठी घरबसल्या नॉमिनेशन फाईल करा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
EPFO
Follow us on

मुंबई: नोकरदारांसाठी भविष्य निर्वाह निधी (PF) हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. दर महिन्याला नोकरदारांच्या पगारातील ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा होत असते. भविष्यात एखादा आर्थिक अडचणीचा प्रसंग उद्भवल्यास किंवा आयुष्याच्या उतारवयात पीएफ खात्यातील साठवलेले पैसे कामाला येतात.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नोकरदारांसाठी अनेक सुविधा सुरु केल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे ई नॉमिनेशन. त्यामुळे पीएफ खातेधारक घरबसल्याही ई-नॉमिनेशन फाईल करु शकतात. ईपीएफओ सदस्य https://www.epfindia.gov.in/site_en/index.php या पोर्टलवर जाऊन हा फॉर्म भरू शकतात.
भविष्यात ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण झालेल्या पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास पीएफ, पेन्शन आणि विम्याचे पैसे सहजपणे वारसदाराला मिळतात.

ई-नॉमिनेशसाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या?

* पीएफ खात्याचा UAN क्रमांक आधारशी लिंक असला पाहिजे.
* तुमचा मोबाईल क्रमांक आणि आधार लिंक असले पाहिजे.
* तुमची सर्व माहिती फोटो आणि घराच्या पत्त्यासह संपूर्णपणे भरलेली असावी.
* कुटुंब अथवा वारसदाराचा स्कॅन केलेला फोटो
* आधार क्रमांक, बँकेचा IFSC कोड

ऑनलाईन ई-नॉमिनेशची प्रक्रिया कशी पूर्ण कराल?

* सर्वप्रथम https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवर जाऊन तुमचे अकाऊंट लॉगिन करावे.
* तुम्ही नॉमिनेशन केले नसेल तर अकाऊंट लॉगिन केल्यानंतर तुम्हाला एक अलर्ट येईल.
* त्यानंतर Manage या पर्यायावर क्लिक करावे. नंतर स्क्रॉलडाऊनमधील e-nomination हा पर्याय निवडावा.
* नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला कुटुंबाविषयीची माहिती विचारली जाईल.
* त्यानंतर तुम्हाला नॉमिनीचा आधार, नाव, जन्मतारीख, बँक अकाऊंट असा तपशील भरावा लागेल.
* त्यानंतर सेव्ह फॅमिली डिटेल्स या पर्यायावर क्लिक करावे. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Save EPF Nomination या पर्यायावर क्लिक करावे.

संबंधित बातम्या:

नोकरी करणाऱ्यांनी लग्नानंतर ही चूक करु नये, नाहीतर अडकून पडतो पीएफचा सगळा पैसा, समजून घ्या महत्वाचा नियम

एजंटची गरज नाही, एका क्लिकवर जाणून घ्या PF संबंधित 4 महत्त्वाची कामं

EPFO कडून सहा कोटी खातेधारकांना महत्त्वाचा इशारा; या गोष्टीचं पालन करा, अन्यथा…

(EPFO Account E-Nomination process)