डेडलाईन संपली तर सोडावे लागेल 7 लाखांवर पाणी, ई-नॉमिनेशन फॉर्म भरा नुकसान टाळा; EPFO खातेधारकांसाठी महत्त्वाचा अलर्ट

| Updated on: Dec 23, 2021 | 8:43 AM

EPFO खातेधारकांसाठी महत्त्वाचा अलर्ट आहे. 31 डिसेबंरपूर्वी ई-नॉमिनेशन (epfo e nomination) करणे अत्यावश्यक आहे. जर सदस्यांनी खात्याशी नामनिर्देशीत व्यक्तीचे नाव जोडले नाही, तर 7 लाख रुपयांवर पाणी सोडावे लागणार आहे.

डेडलाईन संपली तर सोडावे लागेल 7 लाखांवर पाणी, ई-नॉमिनेशन फॉर्म भरा नुकसान टाळा; EPFO खातेधारकांसाठी महत्त्वाचा अलर्ट
ईपीएफओ
Follow us on

मुंबई :  तुमच्या ईपीएफओ (EPFO) खात्याशी संबंधित महत्वाची माहिती आहे. जर तुम्ही अद्यापही तुमच्या वारसाचे नाव पीएफ अकाऊंटला जोडले नसेल तर त्वरीत ही प्रक्रिया पूर्ण करा. नाहीतर तुमच्या वारसांना क्लेम करताना अडचणी तर येतीलच पण 31 डिसेंबरपूर्वी तुम्हीही ई-नॉमिनेशन अर्ज भरुन जमा न केल्यास तुम्हाला 7 लाख रुपयांवरही पाणी सोडावे लागू शकते.

खात्यातील पैसे अडकून पडू शकता

EPFO नुसार, तुम्ही वारसदाराचे नाव जोडले नाही, तर तुमच्या खात्यात पीएफ पोटी पडणारे पैसे अडकून राहू शकतात. गेल्या वर्षापासून वारसदार जोडणीचे काम सुरु आहे. परंतु, अद्यापही अनेक खातेदारांनी त्यांच्या नॉमिनीचे नाव दिलेले नाही. आता EPFO ने नवीन योजना तयार केली आहे, त्यानुसार, खातेदाराने ई-नॉमिनेशन फॉर्म भरला नसेल तर खातेधारक पीएफ खात्यातून रक्कम काढू शकणार नाही. सोबतच दाव्याचा ही निपटारा (Claim Settlement)  होणार नाही. दावा दाखल करण्यापूर्वी ई-नॉमिनेशन करणे अनिवार्य आहे.  पीएफ खातेधारकांना नामनिर्देशीत व्यक्तीचे नाव जोडण्याची कालमर्यादा 31 डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (EPFO) पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नवा जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.

7 लाख रुपयांची मिळते सुविधा

EPFO सदस्यांना विम्याचे संरक्षण मिळते. एम्पलॉई डिपॉजिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम( EDLI Insurance Cover) अंतर्गत विमा कवच मिळते. या विमा योजनेत वारसदाराला 7 लाख रुपयांपर्यंतची विमा सुरक्षा मिळते. जर विना वारसदार पीएफ खातेदाराचा मृत्यू झाल्यास, दाव्याच्या प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. खातेधारकाने त्याची पत्नी, मुले, आई-वडिल यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी ऑनलाईन पीएफ, निवृत्तीवेतन आणि विम्यासाठी ऑनलाईन नॉमिनेशन अर्ज भरणे अनिवार्य आहे.

अशी आहे प्रक्रिया

खातेधारकाने ईपीएफओच्या www.epfindia.gov.in  या  संकेतस्थळाला भेट द्यावी.
त्यानंतर खातेधारकांनी  ‘Service’ हा पर्याय निवडावा
पुढे  ‘For Employees’ या पर्यायवर क्लिक करावे
आता तुमचा UAN हा क्रमांक तयार ठेवा. तो तुम्हाला सॅलरी स्लीप वर (Salary Slip) सापडेल
‘Member UAN/Online Service (OCS/OTCP)’ येथे क्लिक करुन तुम्ही लॉगिन करा
नॉमिनी जोडण्यासाठी  ‘Manage’ पर्याय निवडा
त्यात  ‘E-Nomination’ पर्याय निवडून पुढील प्रक्रिया करा
family declaration हा पर्याय निवडा
‘Add Family Details’ संपूर्ण कुटुंबाची माहिती काळजीपूर्वक, विचारपूर्वक भरा
‘Nomination Details’ हा कॉलम तर अधिक काळजीपूर्वक, अनुभवी व्यक्तीशी सल्ला घेऊन भरा
‘Save EPF Nomination’ हा पर्याय अंतिम टप्प्यातील आहे. सर्व माहिती भरुन झाल्यानंतर हा पर्याय समोर येतो.
‘E-sign’ निवडीनंतर ओटीपी (OTP) येईल.
हा ओटीपी आधार कार्डशी लिंक असेल.
ओटीपी क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या नॉमिनीचे रजिस्ट्रेशन पूर्ण होते.

संंबंधित बातम्या 

Home Loan | कमाईवर नको गृहकर्जाचा भार, योग्य EMI निवडल्यास आर्थिक ओढाताण टळणार

आताच्या काळात रुपयात काय भेटतं हो? काय सांगता, दोन लाखांचा सरकारी विमा भेटतो की, कसा?

टोमॅटो झाले स्वस्त; गेल्या महिन्याभरात भावात 23 टक्क्यांची घसरण