
आपल्या पीएफ अकाऊंटशी आधार लिंक करणे गरजेचे आहे.युनिव्हर्सल अकाऊंट नंबर ( UAN )सोबत आधार लिंक करण्याचा हेतू हा आहे की व्यक्ती काम करत असलेल्या कंपनीच्या अनुमती शिवाय पीएफशी संबंधीत सुविधा कर्मचाऱ्यांना मिळावी. जर सदस्य कर्मचाऱ्याचा आधार UIDAI शी व्हेरीफाय झाला असेल तर तो स्वत:आपले प्रोफाईल अपडेट करु शकतो. परंतू ज्यांचा आधार लिंक किंवा व्हेरीफाईड झालेले नाही त्यांना बदलासाठी Employer किंवा EPFO कडून मंजूरी घ्यावी लागेल.
जर UAN मध्ये नावाची नोंद, जेंडर आणि जन्मतारीख, आधारमध्ये नोंदवलेल्या माहिती तंतोतंत जुळली तर सदस्य आपल्या कंपनी (Employer) कडे जाऊन आधारला UAN शी लिंक करु शकतो. यासाठी एम्पॉयलरच्या पोर्टलवर उपलब्ध KYC फिचरचा वापर केला जाईल आणि EPFO कडून स्वतंत्र मंजूरी घेण्याची गरज लागणार नाही. आधी नाव, जेंडर वा जन्मतिथीशी जराही बदल असेल तर अनेक पातळ्यांवर मंजूरी आणि कागदोपत्री प्रक्रीयेला सामोरे जावे लागत होते.
UAN एक 12 आकड्यांचा यूनिक नंबर आहे, ज्यास EPFO (कर्मचारी भविष्य निधी संघटना) देते. हा क्रमांक नोकरी बदलली तरी कायम राहातो.
EPFO ने आता आधारशी संबंधित माहिती बदलण्यासाठी जॉईंट डिक्लरेशन प्रक्रियेला आणखी सोपे केले आहे. आता ज्यांचा आधारलिंक नाही, वा ज्यांचा आधार अपडेट करायचे आहे. ते आता नवीन सोप्या पद्धतीने हे करु शकतात. जर आधार आणि युएएनमध्ये नाव, जेंडर वा जन्मतारीखमध्ये फरक असेल तर एम्प्लॉयर जॉईंट डिक्लरेशन फॉर्मद्वारे बदलासाठी रिक्वेस्ट करु शकतो.
जर युएएनसोबत ( UAN ) चुकीने चुकीचे आधार लिंक झाले असेल तर एम्प्लॉयर योग्य आधार क्रमांक जॉईंट डिक्लरेशन फॉर्म भरुन ऑनलाईन पाठवू शकतो, ज्यास अधिकारी मंजूर करतील.
जर एम्प्लॉयर उपलब्ध नसेल वा कंपनी बंद झाली असेल कर तो सदस्य संबंधित EPFO रीजनल ऑफिसच्या PRO काऊंटरवर फिजिकल जॉईंट डिक्लरेशन फॉर्म भरु शकतो. या फॉर्मवर कोणा अधिकृत व्यक्तीचे सही गरजेची आहे. तपासानंतर PRO हा रिक्वेस्ट सिस्टीममध्ये घालू शकतो
UMANG एप खोलून आपला UAN नंबर टाकावा
UAN शी रजिस्टर्ड मोबाईलवर OTP येईल
OTP व्हेरीफाय केल्यानंतर आधार डिटेल भरावेत
आधारशी रजिस्टर्ड मोबाईल आणि ईमेलवर दूसरा OTP येईल
OTP व्हेरीफाय होताच हा आधार UAN शी लिंक होईल