PF अकाऊंट असल्यास ‘हे’ पाच मोठे फायदे, जाणून घ्या सर्वकाही

| Updated on: Jun 27, 2021 | 9:38 AM

EPFO | नोकरदार व्यक्तीने आपल्या पीएफ अकाऊंटला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर पैसे काढल्यास त्याला कोणताही कर भरावा लागणार नाही. त्यामुळे पीएफ खातेधारकाला संपूर्ण पैसे मिळू शकतात.

PF अकाऊंट असल्यास हे पाच मोठे फायदे, जाणून घ्या सर्वकाही
EPFO ने घेतलेले पाच मोठे निर्णय
Follow us on

मुंबई: कोरोना संकटामुळे कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात EPFO ने नोकरदारांसाठी अनेक महत्वाची पावले उचलली आहेत. काही दिवसांपूर्वीच नोकरदारांना त्यांच्या खात्यातील भविष्य निर्वाह निधीपैकी (PF) 75 टक्के रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर EPFO ने पीएफ धारकांना त्यांच्या खात्यातून आगाऊ (Advacne) रक्कम काढण्याची परवानगी दिली होती. विशेष म्हणजे ही रक्कम परत करावी लागणार नाही. त्यामुळे पीएफधारकांना संकटाच्या काळात मोठी मदत होणार आहे.

EPFO ने घेतलेले पाच मोठे निर्णय?

पाच वर्षांनी पैसे काढल्यास करमाफी

नोकरदार व्यक्तीने आपल्या पीएफ अकाऊंटला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर पैसे काढल्यास त्याला कोणताही कर भरावा लागणार नाही. त्यामुळे पीएफ खातेधारकाला संपूर्ण पैसे मिळू शकतात.

PF अकाऊंटवर व्याज

EPF खाती दोन प्रकारची असतात. एक म्हणजे Active आणि दुसरे म्हणजे Deactive. Active खात्यात नियमितपणे पैसे जमा होत असतात. तर तीन वर्षात एकदाही पैसे न आल्यास संबंधित PF खाते निष्क्रिय होते. यापूर्वी Deactive खात्यावर व्याज मिळत नव्हते. मात्र, 2016 पासून Deactive PF खात्यावरही व्याज मिळू लागले आहे.

भविष्यासाठी आर्थिक तरतूद

EPF खात्यावर सरकारकडून वर्षाला 8.50 टक्के इतके व्याज मिळते. त्यावर चक्रवाढ व्याज लागून संबंधित नोकरदाराच्या खात्यात चांगली रक्कम जमा होते. पीएफ खात्यामधील दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

रिटायरमेंट फंडावर लाभ

एखाद्या नोकरदाराने निवृत्तीपर्यंत आपल्या पीएफ खात्यामधील रक्कम कधीच काढली नाही तर निवृत्तीनंतर त्याचे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त असेल. तसेच व्याजाची रक्कम धरून त्याच्या पीएफ खात्यात चांगली रक्कम जमा झालेली असेल. त्यामुळे निवृत्तीनंतर नोकरदारांसाठी पीएफ खात्यातील गुंतवणूक मोठा आधार ठरू शकतो.

पेन्शन सुविधा

निवृत्तीपूर्वी तुम्ही पीएफ खात्यामधून कधीच पैसे काढले नाहीत तर तुम्हाला पेन्शनचा लाभही मिळू शकतो. त्यासाठी EPFOच्या EPS (Employee Pension Scheme) योजनेत गुंतवणूक करावी लागेल. 58 वर्षानंतर तुम्हाला पेन्शन मिळायला सुरुवात होईल.

संबंधित बातम्या:

PF खातेधारकांसाठी EPFO चा मोठा निर्णय, कोरोना संकटात ‘या’ सुविधेद्वारे 3 दिवसांत पैसे खात्यात जमा करणार

नोकरदारांची चिंता मिटली; EPFO ने आधारकार्ड UAN नंबरशी लिंक करण्याची मुदत 1 सप्टेंबरपर्यंत वाढवली

नोकरदारांसाठी महत्वाची बातमी; सरकारच्या निर्णयामुळे PF खातेधारकांना होणार मोठा फायदा