AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरदारांची चिंता मिटली; EPFO ने आधारकार्ड UAN नंबरशी लिंक करण्याची मुदत 1 सप्टेंबरपर्यंत वाढवली

EPFO UAN | यापूर्वी EPFO ने नोकरदारांना या कामासाठी 1 जूनपर्यंतचा अवधी देऊ केला होता. त्यानंतर UAN नंबर आणि आधार लिंक नसल्यास पीएफची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही, असे सांगण्यात आले होते.

नोकरदारांची चिंता मिटली; EPFO ने आधारकार्ड UAN नंबरशी लिंक करण्याची मुदत 1 सप्टेंबरपर्यंत वाढवली
प्रोव्हिडंट फंड
| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 8:08 AM
Share

मुंबई: केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधीसाठी (EPFO) वापरल्या जाणारा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि आधार कार्ड (Aadhaar number) लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. त्यानुसार आता नोकरदारांना या दोन्ही गोष्टी लिंक करण्यासाठी 1 सप्टेंबरपर्यंतचा अवधी मिळाला आहे. यापूर्वी EPFO ने नोकरदारांना या कामासाठी 1 जूनपर्यंतचा अवधी देऊ केला होता. त्यानंतर UAN नंबर आणि आधार लिंक नसल्यास पीएफची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे तुर्तास नोकरदारांना दिलासा मिळाला आहे. (epfo extened deadline to seed aadhar card with pf uan no till 1 september 2021)

पीएफ खाते आधारशी लिंक कसे कराल?

स्टेप-1: ईपीएफओचे अधिकृत संकेतस्थळ www.epfindia.gov.in वर जाऊन लॉग इन करा स्टेप-2: त्यानंतर ऑनलाइन सर्व्हिसेसवर क्लिक करा. नंतर ई-केवायसी पोर्टलवर जा. या ठिकाणी link UAN aadhar वर क्लिक करा स्टेप-3: यूएएन अकाउंटशी नोंदणी झालेला तुमचा यूएएन नंबर आणि मोबाइल नंबर अपलोड करा. स्टेप-4: त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी नंबर बॉक्समध्ये भरा. 12 नंबरचा आधार नंबर टाकून फॉर्म सबमिट करा. आता ओटीपी व्हेरिफिकेशन ऑप्शनवर क्लिक करा. स्टेप-5: तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आईडीवर एक ओटीपी येईल. त्याने आधार नंबरला व्हेरिफाय करा. या व्हेरिफिकेशननंतर तुमचे आधार पीएफ अकाउंटशी लिंक होईल.

30 जूनपर्यंत पॅनकार्ड आधारला लिंक न केल्यास होणार रद्द

येत्या 30 जूनपर्यंत तुम्ही तुमचे पॅनकार्ड आधार कार्डासोबत लिंक न केल्यास तुम्हाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. पॅनकार्ड (Pancard) आधारशी न जोडल्यास ते रद्द होईल. तसेच तुम्हाला 1000 रुपयांचा दंडही ठोठावला जाईल. (If you not link pancard to Aadhar card then it will get canclled after 30 June 2021)

सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे सरकारी योजनांपासून अगदी घरगुती कामकाजासाठी आधार कार्ड गरज भासते. सध्या बऱ्याच ठिकाणी आधारकार्डचा वापर हा मुख्य ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे. त्यामुळे 30 जूनच्या आत तुम्ही पॅनकार्ड आणि आधार लिंक करणे गरजेचे आहे.

संंबंधित बातम्या:

नोकरदार, मजुरांसाठी मोठी बातमी, सामाजिक सुरक्षा संहिता लवकरच लागू होणार, श्रमिकांना काय फायदा?

आपणही PF खातेधारक असाल तर ‘हे’ काम लवकर करा, अन्यथा पैसे काढता येणार नाही

UAN नंबर ॲक्टिव्हेट करण्याची सोपी पद्धत, काही वेळामध्ये चेक करा तुमचा पीएफ बॅलन्स

(epfo extened deadline to seed aadhar card with pf uan no till 1 september 2021)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.